मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी एकत्र येतात. राज्यातून रेल्वे मार्गाने तेथे जाणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई / पुणे आणि नागपूर आणि नागपूर – भुसावळ – नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०१७ विशेष ११ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असतील.
गाडी क्रमांक ०१०१८ विशेष रेल्वेगाडी १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१८ विशेष रेल्वेगाडी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.०५ वाजता नागपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल. या दोन्ही रेल्वेगाड्यांना सिंदी, सेवाग्राम (फक्त ०१२१८ साठी), वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबा असेल.
गाडी क्रमांक ०१२१५ विशेष रेल्वेगाडी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता नागपूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१६ विशेष रेल्वेगाडी पुणे येथून ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. या दोन्ही रेल्वेगाड्यांना अजनी (फक्त ०१२१६ साठी), सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड मार्गिका येथे थांबे असतील.
हेही वाचा >>>गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू
भुसावळ – नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष क्रमांक ०१२१३ भुसावळ येथून १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल. मेमू विशेष क्रमांक ०१२१४ नागपूर येथून १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४० वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता पोहोचेल.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या विशेष रेल्वेसाठी विशेष शुल्कासह ७ ऑक्टोबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेस्थळावर आरक्षण करता येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.