मुंबई : दुर्घटनाग्रस्त ‘नीलकलम’ बोटीतील ११५ प्रवाशांपैकी बेपत्ता असलेल्या हंसाराम भाटी (४३) बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे भाटी कुटुंब हादरले आहे. गावी नदीमध्ये पोहणाऱ्या हंसारामचा या दुर्घटनेत मृत्यू झाला यावर कुटुंबीय विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.

कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर भावाची व्याकुळतेने वाट पाहणारा भाटीचा मोठा भाऊ जोगाराम भाटी (६०) यांना दुःख अनावर झाले होते. ते म्हणाले, “माझा भाऊ पट्टीचा पोहणारा होता. त्याचा अद्याप ठावठीकाणा लागलेला नाही. पोलीस, तटरक्षक दल किंवा नौदलाकडून आम्हाला त्याच्याबद्दल काहीही कळलेले नाही. असे बोलून जोगाराम भावूक झाले. तो कुठे आहे, त्याच्याबद्दल काहीच समजलेले नाही. गावी नदीच्या जलद प्रवाहातही उत्तम होणाऱ्या माझ्या भावाला त्याच्या मुलाने शेवटचे पाहिले. त्यावेळी त्याने सुरक्षा जॅकेट घातले होते. त्यामुळे तो बुडाला असेल, यावर विश्वासच बसत नसल्याचे जोगाराम यांनी सांगितले.

mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
graphic representing the issue
Honor Killing : बापाने पोलिसांसमोरच पोटच्या मुलीवर झाडल्या गोळ्या, चार दिवसांवर आलं होतं लग्न; नेमकं काय घडलं?
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा…खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या तरुणाला मारहाण करून लूटले

भाटी मालाड (पूर्व) येथील तानाजी नगरमध्ये राहत होता. त्याची खोटे दागिने बनवण्याची छोटी कार्यशाळा आहे. भाटी आणि त्याचे कुटुंब (पत्नी संतोष आणि मुलगा तरुण) पाली जिल्ह्यातील त्याचे नातेवाईक प्रवीण राठोड (३२) आणि त्यांची पत्नी नीता राठोड (२८) यांना सहलीसाठी घेऊन गेले होते. संतोष, तरुण आणि राठोड दाम्पत्म्या अपघातातून वाचले, पण हंसाराम वाचू शकला नाही.

हंसाराम पट्टीचा पोहणारा होता. सुरक्षा जॅकेट परिधान न केलेले चौघे या अपघातातून वाचले आणि जॅकेट घातलेला पट्टीचा पोहणारा वाचू शकला नाही ? हे मान्य करणे खूप कठीण आहे, असे त्यांचा मित्र रंजीत परमार यांनी सांगितले. या घटनेमुळे हंसाराम यांची पत्नी संतोष आणि मुलगा तरूण प्रचंड तणावात आहेत. तरूणने वडिलांना शेवटचे पाहिले होते. आता ते सापडत नाही, त्यामुळे तो व्यथित असल्याचे भाटी यांच्या कुटुंबियांनी सांगितले. हंसाराम यांचे बंधू जोगाराम यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader