मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील (कोस्टल रोड) नव्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होत असताना पोलिसांनीही तेथील वाहतुकीत बदल केले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले.

कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनी मार्गावर मरिन ड्राईव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) / वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन) / लाला लजपतराय कॉलेज / बिंदूमाधव ठाकरे जंक्शन मार्गे वांद्रे टोल प्लाझाकडे जाणारी वाहतूक, तसेच वरळी कोळीवाडा – प्रभादेवीकडे जाणारी उत्तर वाहिनी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यत सुरू राहील आणि रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

On Republic Day Dr ravindra singhal and others were awarded Presidents Medal for Distinguished Service
रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ४३ पदके
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
passengers struggled due to western railway mega block on Saturday
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा…रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ४३ पदके

वांद्रे टोल प्लाझाकडून कोस्टल रोड कनेक्टर पुलाद्वारे मरिन ड्राईव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) / वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन) जाणारी दक्षिण वाहिनी सकाळी ७ पासून रात्री १२ पर्यंत सुरू राहील. तसेच बिंदूमाधव ठाकरे जंक्शनकडून सी लिंक गेटद्वारा वांद्रे टोल प्लाझाकडे जाणारी उत्तर वाहिनी सकाळी ७ पासून रात्री १२ पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. हा बदल २७ जानेवारीपासून सकाळी ७ पासून पुढील निर्णय येईपर्यंत अंमलात राहणार आहे. कोस्टल रोड कनेक्टर पूल ८० किमी, वळणाच्या ठिकाणी ४० किमी व कोस्ट रोड उतरणीवर ३० किमी वेग मर्यांदेचे निर्बंध घालण्यात आले आहे. याबाबतचे आदेश वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.

Story img Loader