Latest News in Mumbai Today : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तसंच भारतातील एक महत्त्वपूर्ण आर्थिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन घडामोडींचे एक केंद्रही आहे. तेव्हा राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Today, 07 March 2025
मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवस कालीन ब्लाॅक नाही.
मार्वे खाडीवरील पूल पाडण्यास स्थगिती द्या, रॅम्पच्या पुनर्बांधणीचे आदेश द्या, मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : मालाड-मालवणीस्थित एव्हरशाईन नगरमधील मार्वे खाडीवरील १५ वर्षे जुना पूल पाडण्यास स्थगिती द्यावी. तसेच, पुलाच्या रॅम्पच्या पुनर्बांधणीचे आदेश महापालिकेला द्यावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच महापालिकेने हा रॅम्प पाडला होता.
राणीच्या बागेत लवकरच मिनी बस
मुंबई : झाडांची शितल छाया, वन्यप्राण्यांचा अधिवास, पक्ष्यांची किलबिल आणि पेंग्विन दर्शन घडवणाऱ्या आणि लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले नवस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले वळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राणीच्या बागेत लवकरच बच्चे कंपनीसाठी मिनी बस आणण्यात येणार आहे.
माटुंग्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत दुकानांवर हातोडा, ३० दुकाने जमीनदोस्त
मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फूल बाजार परिसरात अतिक्रमण करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांवर सलग दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेने निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईअंतर्गत एकूण ३० दुकाने शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आली.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटीच्या नावाखाली सायबर फसवणूक
मुंबई : एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने केल्यानंतर आता त्याचाच फायदा घेऊन सायबर फसणूक केली जात आहेत. उच्च-सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनमालकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : पश्चिम द्रुतगतीमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई : वांद्रे, खेरवाडी परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोटरगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भरधाव वेगात आलेली मोटरगाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दुचाकीवर धडकली. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कसारा स्थानकादरम्यान दोन दिवसीय ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल
मुंबई : मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकावर उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मुंबईकरांची उकाड्याने काहिली
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा जाणवत असला तरी मुंबईकरांना दुपारी उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे.
जुहू किनाऱ्यावरील पर्यटकांच्या गोंधळामुळे समुद्री कासव अंडी न घालताच माघारी
मुंबई : दोन दिवसांपूर्वी जुहू समुद्रकिनाऱ्यावर दृष्टीस पडलेले समुद्री कासव अंडी न घालताच समुद्रात निघून गेल्याचा दावा सागरी संवर्धन कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमींनी केला आहे. जुहू समुद्र किनाऱ्यावर झालेल्या दाटीवाटीमुळे मादी कासव अंडी न घालताच माघारी समुद्रात गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बेस्ट उपक्रमाला हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार
मुंबई : बेस्ट उपक्रमाला ‘ऊर्जा संक्रमण – मार्ग प्रकाश विद्युतीकरणमधील शहरी स्थानिक संस्था उत्कृष्टता पुरस्कार’ या श्रेणीअंतर्गत ‘पाचवा हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार मिळाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटीला राज्य सरकारकडून ३५० कोटी रुपये निधी, एसटीला ९९३ कोटी रुपयांची आवश्यकता
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला दर महिन्याला सरकारकडून विविध सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम मिळत असते. त्यातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. मात्र गेले काही महिने अपूर्ण रक्कम मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युटी, बँक कर्ज व इतर सर्व देणी थकीत असून कर्मचाऱ्यांना सध्या केवळ वेतन मिळत आहे.
सोन्याच्या तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुंबई : भारतात सोन्याला प्रचंड मागणी असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
महालक्ष्मी आणि वरळीकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती !
Functional: Imp. update ? for anyone commuting this weekend towards Mahalaxmi or Worli.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) March 7, 2025
Due to big scale events happening at Mahalaxmi Racecourse and NSCI, Worli, and certain key roads like Arthur Rd, Sant Gadge Maharaj Rd, a part of Senapati Bapat Marg being under construction
चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तब्बल ३२ वर्षांनी सापडला
मुंबई : चोरीच्या गुन्ह्यांत ३२ वर्षांपासून फरार असलेल्या ५० वर्षीय आरोपीला पुन्हा अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले. आरोपी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई : सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना सोने तस्करीप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक केली. त्यांच्याकडून २१ किलो २८८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १८ कोटी ९२ लाख रुपये आहे.
सागरी किनारा मार्गावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तांब्याच्या तारांच्या चोरीप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल
मुंबई : सागरी किनारा मार्गावर पादचाऱ्यांना प्रवेश नसला तरी चोरांमुळे सध्या मुंबई महापालिका प्रशासन व कंत्राटदार हैराण झाले आहेत. या मार्गावर विजेच्या खांबांमधील तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेच्या कंत्राटदाराने याप्रकरणी पोलीस ठाण्यात पाच ते सहा तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप चोरांचा बंदोबस्त होऊ शकलेला नाही.
शासकीय भूखंडाचे मालकीत रुपांतर करण्यास ३१ डिसेंबरपर्यंतच सवलत, अंतिम अधिसूचना जारी
मुंबई : कब्जेहक्क वा भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या शासकीय भूखंडाचे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये (मालकी हक्क) रूपांतर करण्यास राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सवलत दिली आहे. त्यानंतर मात्र ठरलेल्या सहा ते सातपट वाढीव दराने शासकीय भूखंडाचे मालकीत रूपांतर करावे लागणार आहे. याबाबत अखेर महसूल व वन विभागाने अंतिम अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला तीन वर्षे पूर्ण, नगरसेवकांशिवाय पालिकेचा तीन वर्षांचा कारभार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून गेली तीन वर्षे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत पालिका आयुक्तांची म्हणजेच प्रशासकांची राजवट सुरू आहे.
…अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या, गिरणी कामगार आक्रमक, मुंबईत घरे देण्याच्या मागणीवर ठाम
मुंबई : दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईबाहेर फेकण्याचा डाव राज्य सरकारने आखला आहे. मात्र हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार करीत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे देण्याची मागणी ‘गिरणी कामगार एकजूट’ने केली आहे.
गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प : भूमिगत जुळ्या बोगद्याच्या खोदकामासाठी टीबीएम सयंत्र ऑगस्टमध्ये चित्रनगरीत
मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे जुळे बोगदे खोदण्यात येणार आहे. या भुयाराच्या खोदकामासाठी टनेल बोअरिंग सयंत्र (टीबीएम) ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. हे टीबीएम संयंत्र ठेवण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने चित्रनगरी व्यवस्थापनाकडे केली आहे.
मुंबई : वृक्षहानीमुळे ठेकेदाराला २० हजारांचा दंड, प्रभादेवीमध्ये काँक्रीटीदरम्यान मुळांना हानी
मुंबई : रस्त्याचे काम करताना झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी रस्ते कंत्राटदाराला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली आहे.
म्हाडा नाशिक मंडळाची ५०२ घरांसाठी सोडत : अर्जविक्री – स्वीकृतीला २१ मार्चपर्यंत मुदतवाढ
मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे.
‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी १२ वर्षांच्या दोन मुली घरातून पळाल्या मुंबई पोलिसांनी शोधून काढले
मुंबई : बेपत्ता झालेल्या दोन १२ वर्षांच्या मुलींना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात शोध मोहीम राबवली. अखेर गस्तीवर असलेल्या पथकाला मुलींचा शोध घेण्यात अखेर यश आले. घरातून पळाल्यानंतर या मुलींनी लोकलने प्रवास केला, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, बागेत रात्र घालवली आणि नंतर त्या वॉटर किंगडममध्ये गेल्याचे उघडकीस आले आहे.
पत्राचाळीतील ७२ दुकानांचा प्रकल्प अखेर रद्द, मूळ रहिवाशांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाचा निर्णय
मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसित इमारतींच्या तळमजल्यावरील ७२ दुकानांचा प्रकल्प अखेर म्हाडाने रद्द केला. पत्राचाळीतील ६७२ मूळ रहिवाशांनी तीव्र विरोध करीत दुकानांचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर रहिवाशांच्या पाठपुराव्याला यश आले असून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ७२ दुकानांचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अदानी की एल अँड टी? मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या निविदेत कोणाची बाजी
मुंबई : सध्या धारावीसह अनेक महत्त्वाचे मोठे पुनर्विकास प्रकल्प ज्या खासगी समूहाकडे आहेत, तो अदानी समूह मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेच्या स्पर्धेत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत अदानी की एल. अँड टी. बाजी मारणार हे आठवड्याभरात स्पष्ट होईल.गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासासाठीची आर्थिक निविदा खुली करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.
राजकारणातील डॉक्टर एमएमसीच्या निवडणुकीतून बाद
मुंबई : दोन वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदारयादीतून ७० हजार डॉक्टरांना बाद करण्यात आले आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले सहा ते सात डॉक्टर आमदार, खासदारांचाही यात समावेश आहे.
मुंबई न्यूज अपडेट्स ( file photo )