Latest News in Mumbai Today : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहे. अवघ्या दोन दिवसात तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी निसर्ग उद्यान मार्गाला भेट दिली. तेव्हा मुंबईतील राजकीय घडामोडी तसंच न्यायालय, मनोरंजन क्षेत्र, गुन्हे, महापालिका क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्यामाध्यमातून मिळेल.

Live Updates

Mumbai Maharashtra News Today, 1 April 2025

20:11 (IST) 1 Apr 2025
सातव्या वेतन आयोगातील भत्त्यापासून निवृत्त डॉक्टर वंचित, मुंबई महानगरपालिकेच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संताप
वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आयोगातील ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स) नाकारण्यात आला आहे. मागील सहा वर्षांपासून व्यवसायरोध भत्ता देण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. ...Learn More
19:58 (IST) 1 Apr 2025

खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकार अटकेत, दोघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई ; घाटकोपर परिसरात दुधाचा व्यवसाय करणाऱ्या तीन व्यवसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एका तोतया पत्रकाराला पंतनगर पोलिसांनी अटक केली. तसेच चेंबूरमधील एका बांधकाम ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांविरोधात आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून घाटकोपरमधील पंतनगर परिसरात रमेश कोळी, विनोद गौड आणि परशुराम पनिकेरा हे तिघे दूध विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या तिघांकडे गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी अल्ताफ शेख पत्रकार असल्याचे सांगून त्यांच्याकडून खंडणी घेत होता. सण जवळ आल्यानंतर तो त्यांच्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करीत होता. तीन दिवसांपूर्वी त्याने दूध विक्रेत्यांकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. दूध विक्रेत्यांनी त्याला हे पैसे देण्यास नकार देताच आरोपीने पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अखेर दुध विक्रेत्यांनी याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

दरम्यान, चेंबूरमधील सिंधी कॅम्प परिसरात दोन तोतया पत्रकारांनी एका बांधकाम ठेकेदाराला धमकावले आणि त्याच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र ठेकेदाराने पैसे देण्यास नकार देताच आरोपीने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ठेकेदाराने आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या आधारे पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

17:59 (IST) 1 Apr 2025
वांद्र्यातील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा; १०० झोपडीधारकांना मालवणीऐवजी आता वांद्रयातच घरे
१०० झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला असून उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. गौतम नगरमधील रहिवाशांच्या लढ्याला यश आले आहे. ...Read More
17:28 (IST) 1 Apr 2025
स्वस्तात सोने देण्याच्या आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वाकोला पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ...Read Full Details
15:16 (IST) 1 Apr 2025

पंतप्रधान आवास निधीतील चार प्रकल्पांना अतिरिक्त निधी; वसुलीसाठी म्हाडाकडून नोटिसा

पंतप्रधान आवास निधीतील चार प्रकल्पातील विकासकांना अतिरिक्त निधी वितरीत झाल्याचे ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने (म्हाडा) राज्य शासनाला दिलेल्या अहवालात मान्य केले आहे. सविस्तर वाचा…

13:31 (IST) 1 Apr 2025

झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याची उधळपट्टी; अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती, वापरावर नियंत्रणाची गरज

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला असून महापालिकेने राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठा वापरण्याची मागणी केली आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान जलवाहिन्यांना गळती लागून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सविस्तर वाचा…

13:27 (IST) 1 Apr 2025

महापालिका शाळा, वर्गखोल्यांचे गोदाम; शाळांच्या सभागृहांत निवडणुकीचे साहित्य

मुंबई : महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्याचा पालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र निवडणूक कार्यालयाचा आडमुठेपणा त्यात अडसर ठरत आहे. पालिका शाळांतील १५ सभागृह व ७८ वर्गखोल्या निवडणूक कार्यालयाने ताब्यात घेतल्या आहेत. त्यात निवडणुकीचे साहित्य ठेवण्यात आले आहे.

सविस्तर बातमी...

13:26 (IST) 1 Apr 2025

मुंबई : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहे. अवघ्या दोन दिवसात तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी निसर्ग उद्यान मार्गाला भेट दिली.

वाचा सविस्तर...

13:24 (IST) 1 Apr 2025

Mumbai Rain News : मुंबईत आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सविस्तर बातमी...

 

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज अपडेट्स