Latest News in Mumbai Today : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील विविध राजकीय घडामोडी, महानगरपालिकेशी संबंधित बातम्या, विविध न्यायालयातील निकाल, गुन्हे वृत्त, वाहतूकीचे अपडेड्स अशी विविध माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Maharashtra News Today, 12 march 2025 : मुंबईतील घडामोडी एका क्लिकवर…
शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती; तक्रारी दूर करण्याला प्राधान्य
मुंबई : राज्य सरकारला ‘शक्तीपीठ महामार्ग’ पूर्ण करावयाचा आहे. पण, हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादायचा नाही. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यांच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन अडचणी सोडविल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
एसटी बस गाड्यांची निविदा माझ्या अपरोक्ष; महिनाभरात चौकशी करून कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) १,३१० बस गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय माझ्या अपरोक्ष झाला. महामंडळाच्या पातळीवर संगनमताने झालेल्या या निर्णयामुळे एसटीचे १,७०० कोटी रुपयांचे नुकसान होणार होते. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
वर्सोवामध्ये ठाकरे गटाला उमेदवार शोधावा लागणार; तीन माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे)
मुंबई : गेल्या काही दिवसात पश्चिम उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला (ठाकरे) खिंडार पडले आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे) चार माजी नगरसेवक होते. चारपैकी तीन माजी नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात उपस्थित; न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते
मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. आझमी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात उपस्थित; न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते
मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते. आझमी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
वर्सोवामध्ये ठाकरे गटाला उमेदवार शोधावा लागणार; तीन माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे)
मुंबई : गेल्या काही दिवसात पश्चिम उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला (ठाकरे) खिंडार पडले आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे) चार माजी नगरसेवक होते. चारपैकी तीन माजी नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेला (ठाकरे) येथील प्रभागांसाठी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.
भांडूपमधील कक्कया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे हटवली; तीन मीटर अरुंद असलेला रस्ता आता १८ मीटर रुंद
मुंबई : भांडूप पश्चिम परिसरातील कक्कया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे बुधवारी मुंबई महानगरपालिकेने पाडून टाकली. यामध्ये ६२ घरे आणि १३ दुकानांचा समावेश आहे. या कारवाईमुळे हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी हा ३ मीटर अरुंद असलेला मार्ग आता १८.३० मीटर इतका रुंद झाला आहे.
आठ तासांहून अधिक डिजिटल अटक करून तरूणाची लाखोंची फसवणूक
मुंबई : परळ येथील ३१ वर्षीय तरूणाची तोतया सायबर अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सक्त वसुली संचलनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या यंत्रणा तपास करीत असल्याची भीती दाखवून आरोपींनी तक्रारदार तरूणाला ८ तासांहून अधिक काळ डिजिटल अटक केली होती.
सविस्तर वाचा
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून एकाच दिवशी १७१ रुग्णांना मदत; सुमारे दीड कोटी रुपयांची मदत वितरीत
मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून १० मार्च २०२५ रोजी एकाच दिवशी १७१ रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली. या रुग्णांना तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
अश्लील गाणी गाणारे, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यावर कारवाई; धुलीवंदनासाठी पोलिसांकडून आदेश जारी
मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला (बेस्ट) गेल्या आठवड्यात दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्जा कार्यक्षमता पुरस्कार आणि परिवहन उत्कृष्टता पुरस्कार बेस्टला देण्यात आले. बेस्टच्या परिवहन विभागाची दुर्दशा झाली असून कामगारांचे पगार देणेही मुश्कील झाले आहे.
आलबेल नसतानाही बेस्टला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार; कामगारांमध्ये नाराजी
मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला (बेस्ट) गेल्या आठवड्यात दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्जा कार्यक्षमता पुरस्कार आणि परिवहन उत्कृष्टता पुरस्कार बेस्टला देण्यात आले. बेस्टच्या परिवहन विभागाची दुर्दशा झाली असून कामगारांचे पगार देणेही मुश्कील झाले आहे.
दोन महिला तिकीट तपासनीसांची विक्रमी दंड वसुली; पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची धरपकड
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दोन महिला तिकीट तपासनीसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करून दंड वसुलीचा नवा विक्रम केला आहे. मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल आणि उपमुख्य तिकीट निरीक्षक (दादर) मल्लिगा यांनी केलेल्या विक्रमी दंड वसुलीमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत लाखो रुपये महसुलाची भर पडली आहे.
जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या अधिक वेगात; अद्ययावत बायोकेमिस्ट्री अनालायझर रुग्णालयात दाखल
मुंबई : रक्त तपासण्या, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड, मूत्र, प्लाझ्मा आणि सीरममधील विविध घटक, रसायनांचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारे पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ॲनालायझर यंत्र जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातील रक्त तपासण्या आता वेगाने होणार आहेत. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या हजारो रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
दादर-रत्नागिरी फक्त तीन दिवसांसाठी विशेष रेल्वेगाडी; कायमस्वरूपी रेल्वेगाडी नाहीच?
दादर-रत्नागिरी कायमस्वरूपी रेल्वेगाडी सुरू करणे अशक्य असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. त्यात सध्या सुरू करण्यात आलेली विशेष गाडी दादर-रत्नागिरी दरम्यान फक्त तीन दिवसांसाठी धावणार आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचा प्रकार घडल्याचे प्रवाशांचे मत आहे.
न्यू इंडिया को ऑप बँक प्रकरण : बँकेच्या महाव्यवस्थापकाची लायडिटेक्टर चाचणी
मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहारातील मुख्य आरोपी व बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याची मंगळवारी सुमारे अडीच तास लायडिटेक्टर चाचणी करण्यात आली. तपासाच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची मानली जाते.
होळीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; ‘तसली’ गाणी वाजवण्यास बंदी, जाणून घ्या इतर नियम
Mumbai Police Advisory for Holi: १३ मार्च रोजी होळी आणि १४ मार्च रोजी धुलिवंदन सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त मुंबईत शांतता आणि सुरक्षितता राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत.
Black Magic at Lilavati Hospital : मानवी केस, अवशेष असलेली आठ भांंडी सापडली; लिलावती रुग्णालयात काळी जादू!
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लिलावती रुग्णालयात गेल्या २० वर्षांत १२५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी ट्रस्टने १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील माहिती लिलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. लिलावती रुग्णालयात काळी जादू केली जात असल्याचं ते म्हणाले.
मुंबई विमानतळावर मानवी तस्करीचे प्रकरण उघडकीस, हरियाणातील सात जणांना लंडनमध्ये स्थायिक करण्याचा प्रयत्न
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी आठ जणांना थांबवण्यात आले. त्यातील तिघे अल्पवयीन असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. सर्व जण लंडन येथील एका विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न करत होते.
मुंबई न्यूज अपडेट्स