Latest News in Mumbai Today Live : मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी बुधवारी पहाटे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. या दूरध्वनीनंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. तसेच दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. आरोपीने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. तर पुढील दोन – तीन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Live Updates
Mumbai Maharashtra News Today, 16 April 2025
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण; डॉ. घैसास, तनिषांच्या कुटुंबियांची पुढील आठवड्यात एमएमसीकडे सुनावणी
पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानात मंगेशकर रुग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांची पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (एमएमसी) सुनावणी घेण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
प्रोस्टेट समस्येवर ग्रीनलाइट लेझरच्या उपचारामुळे ६४ वर्षीय रुग्णाला जीवदान
वारंवार मूत्रवाहिनीमध्ये होणाऱ्या संसर्गावर विविध उपचार करूनही बरे वाटत नसल्याने ६४ वर्षीय संपत प्रफुल त्रस्त झाले होते. …सविस्तर बातमी
मासळी विक्रेत्यांच्या गाळ्यांवर महापालिकेचा हातोडा; परवानाधारक सात महिलांचे महापालिकेच्या मंडईत पुनर्वसन
बेलासिस पुलालगतच्या बाजारातील सात मासळी विक्रेत्या महिलांचे महानगरपालिका प्रशासनाने ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या मंडईत पुनर्वसन करण्यात आले. …सविस्तर वाचा
अंतिम मुदतीत कागदपत्र न देणारे धारावीकर हक्काच्या घरापासून अखेर वंचित ? सर्वेक्षण झालेल्या ठिकाणी असहकार करणाऱ्यांना आता मुदतवाढ नाही
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वर्षभरापासून धारावीत सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कागदपत्रे जमा न करणाऱ्या, असहकार करणाऱ्या धारावीकरांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून (डीआरपी) कागदपत्रे जमा करण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. …सविस्तर बातमी
ई-मेल स्पुफिंगद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक; व्यावसायिक महिलेची लाखो रुपयांची फसवणूक
युनायटेड किंगडम (युके) येथील कंपनीला रसायन निर्यात करून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिक महिलेची लाखो रुपयांंची सायबर फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली. …सविस्तर बातमी
रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या कामामध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदाराना अपात्र करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
रस्ते कॉंक्रीटीकरण हाच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कायमस्वरुपी इलाज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. …सविस्तर वाचा
जे.जे. येथील २००९ सालचे दुहेरी हत्याकांड : छोटा राजन टोळीतील दोघांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम
राजनला निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाला मात्र सीबीआयकडून आव्हान नाही …वाचा सविस्तर
‘हनी ट्रॅप’बाबत तरूण पिढीने सावधगिरी बाळगण्याची गरज; माजी नौदल प्रशिक्षणार्थीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
समाज माध्यमांच्या माध्यमातून असुरक्षित तरुणांना लक्ष्य करून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या वाढत्या धोक्याबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. …सविस्तर बातमी
इगतपुरी – आमणे समृद्धी महामार्ग; ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी आता १ मेचा मुहूर्त
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणेदरम्यानचा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत केव्हा दाखल होणार आणि नागपूर – मुंबई थेट प्रवास आठ तासात केव्हा करता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. …सविस्तर वाचा
इगतपुरी – आमणे समृद्धी महामार्ग; ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी आता १ मेचा मुहूर्त
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणेदरम्यानचा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत केव्हा दाखल होणार आणि नागपूर – मुंबई थेट प्रवास आठ तासात केव्हा करता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. …सविस्तर वाचा
मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, दारूच्या नशेत दूरध्वनी केल्याचे निष्पन्न
मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी बुधवारी पहाटे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. या दूरध्वनीनंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. …सविस्तर बातमी
पूर्व मुक्त मार्गांवर भरधाव मोटरगाडीची दुभाजकाला धडक; २ ठार, ४ जखमी
पूर्व मुक्त मार्गांवर ऑरेंज गेट जवळ सोमवारी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले. …वाचा सविस्तर
तीव्र झळांनी मुंबईकर ‘तप्त’, आणखी काही दिवस तापमान वाढीचा फटका
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. …अधिक वाचा
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स