Latest News in Mumbai Today Live : ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले या ५.३९ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो गाड्यांसह इतर यंत्रणांच्या चाचण्यांना (ट्रायल रन) बुधवारी सुरुवात झाली. या चाचण्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच हार्बर मार्गिकेवर डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो धावली. केईएम रुग्णालयामध्ये २००९-१० पासून रोजंदारी व २०१६-१७ पासून बहुउद्देशीय कामगार चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतनच झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. मुंबईतील अशा विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…

Live Updates

Mumbai Maharashtra News Today, 17 April 2025

08:18 (IST) 18 Apr 2025

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; आज सेवा उशिरा सुरू होणार, ‘या’ वेळेतच प्रवासाचं करा नियोजन

Mumbai Metro Latest Updates : मुंबई मेट्रोने यासंदर्भातील मााहिती एक्सवर पोस्ट केली आहे. …अधिक वाचा
03:30 (IST) 18 Apr 2025

सहकारी साखर कारखान्यांकडून पाच हजार कोटींच्या कर्जाची मागणी

संघाकडून सातत्याने पाठपुरवा केला जात असला तरीही सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. …सविस्तर वाचा
00:26 (IST) 18 Apr 2025

हायब्रिड तंत्राद्वारे साडेचार वर्षांच्या बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया

जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले, मात्र साडेचार वर्षांची होईपर्यंत तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने पालकांना धक्काच बसला. …सविस्तर वाचा
23:03 (IST) 17 Apr 2025

नवी मुंबईतील पाम बीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाकडून बांधकामाला हिरवा कंदील

नवी मुंबईतील क्विन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गालगत सर्व्हिस रोडच्या बांधकामाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावून या रस्त्याला हिरवा कंदील दाखवला. …सविस्तर बातमी
22:07 (IST) 17 Apr 2025

राज्य सरकारने आर्थिक मदत केली तरच बेस्ट जगेल, खासदार नारायण राणे घेणार पुढाकार

स्ट उपक्रमाच्या विविध प्रश्नांवर आतापर्यंत कोणताही तोडगा प्रशासकीय पातळीवरून आणि राजकीय पातळीवरून निघालेला नाही. आता या प्रश्नासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. …वाचा सविस्तर
20:25 (IST) 17 Apr 2025

हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्यांचा पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, कुर्ल्यातील घटना

खेळणाऱ्या मुलांना बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या चौघांनी १७ वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी कुर्ल्यात घडली. …अधिक वाचा
20:18 (IST) 17 Apr 2025

आरेच्या जंगलात सोडले २० भटके श्वान… तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरूच

काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे आरेच्या जंगलात सोडण्यात आलेल्या कांदिवलीतील भटक्या श्वानांच्या बचावासाठी हाती घेतलेली शोध मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. …सविस्तर बातमी
20:05 (IST) 17 Apr 2025

घाटकोपरमध्ये मांसाहारावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद, मनसेचे आंदोलन

घाटकोपरमध्ये मांसाहारावरून मराठी विरुद्ध गुजराती भाषकांमध्ये वाद झाला असून या वादामध्ये मनसेने उडी मारली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर सोसायट्यांमध्ये जाऊन आंदोलन केले. …वाचा सविस्तर
16:03 (IST) 17 Apr 2025

मुंबईत उष्मा कायम, पण… ‘उष्णतेच्या लाटे’पासून दिलासा!

शहर तसेच उपनगरात पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होतील. तसेच आर्द्रता अधिक असल्यामुळे उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवेल. …वाचा सविस्तर
14:34 (IST) 17 Apr 2025

‘गुंदवली – विमानतळ मेट्रो ७ अ’ : १.६४७ किमी भुयारीकरण पूर्ण… भूर्गभातून ‘दिशा’ बाहेर

एमएमआरडीएने या मार्गिकेच्या कामाला वेग दिला असून या मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा गुरुवारी यशस्वीपणे पूर्ण झाला. …वाचा सविस्तर
13:18 (IST) 17 Apr 2025

एकनाथ शिंदेविरोधातील विडंबनात्मक गाण्याचे प्रकरण; निकलापर्यंत कुणाल कामरा अटकेपासून संरक्षण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी विनोदकार कुणाल कामरा याने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निर्णय बुधवारी राखून ठेवला. …वाचा सविस्तर
12:20 (IST) 17 Apr 2025

मध्यवर्ती कारागृहात घुसमटीची शिक्षा; ९९९ कैद्यांच्या क्षमतेच्या जागेत ३ हजारांहून अधिक कैदी

गेल्या काही वर्षात मुंबईत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि गुन्हेगारांचीही संख्या वाढू लागली आहे. परिणामी, मुंबई मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ठेवण्यास आता जागा शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले. …सविस्तर वाचा
11:33 (IST) 17 Apr 2025

२१ कोटींचे कोकेन जप्त; परदेशी महिलेला अटक

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत परदेशी महिलेला अटक करण्यात आली. …सविस्तर वाचा
11:30 (IST) 17 Apr 2025

सायबर फसवणूक : पीडितांच्या मदतीसाठी ‘डिजिटल रक्षक’ मदत क्रमांक कार्यान्वित

सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला दूरध्वनी किंवा व्हॉटस्अच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवीन ‘डिजिटल रक्षक’ मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
11:29 (IST) 17 Apr 2025

मुंबई : दुचाकी घसरल्यामुळे एकाचा मृत्यू

एल्फिन्स्टन पुलावर बधवारी दुचाकी घसरल्यामुळे ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. …वाचा सविस्तर
08:29 (IST) 17 Apr 2025

हार्बर मार्गिकेवरील डायमंड गार्डन-मंडालेदरम्यान पहिल्यांदाच धावली मेट्रो

‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले या ५.३९ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो गाड्यांसह इतर यंत्रणांच्या चाचण्यांना (ट्रायल रन) बुधवारी सुरुवात झाली. …सविस्तर वाचा
08:28 (IST) 17 Apr 2025

केईएम रुग्णालयात कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित

केईएम रुग्णालयामध्ये २००९-१० पासून रोजंदारी व २०१६-१७ पासून बहुउद्देशीय कामगार चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतनच झालेले नाही. …अधिक वाचा
08:28 (IST) 17 Apr 2025

मुंबईच्या तापमानात घट, मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम

मागील दोन दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानात बुधवारी घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. …वाचा सविस्तर
08:27 (IST) 17 Apr 2025

पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा; शिवसेनेचा (ठाकरे) हंडा मोर्चा

शिवसेनेतर्फे (ठाकरे) बुधवारीही हंडा मोर्चा काढण्यात आला होता. परळ, शिवडी, वरळी, प्रभादेवी, ग्रॅन्ट रोड येथील विभाग कार्यालयावर बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. …सविस्तर वाचा

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स