Latest News in Mumbai Today Live: १ एप्रिलपासून राज्यभरातील महामार्ग, शीघ्रसंचार महामार्ग, सागरी सेतूवरील पथकर नाक्यांवर फास्टॅगद्वारेच पथकर वसूल करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सज्ज झाले आहे. तसेच मुंबईतील राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 17 march 2025
अपघातानंतर आठ वर्षांपासून तरूणी कोमात, उपचारांसाठी पाच कोटींची भरपाई देण्याचा विचार करा, उच्च न्यायालयाचे रेल्वे मंत्र्यांना आदेश
निधी राजेश जेठमलानी ही तरूणी २८ मे २०१७ रोजी मरीन प्लाझा हॉटेलसमोरील रस्ता ओलांडत असताना पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या इनोव्हा गाडीने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झाली होती.
मुंबई : कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरुवात
पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता यावा यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उप-परिसरात १०० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
ठाणे उप-परिसरातील १०० किलोवॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये नेट मीटरिंग प्रणाली आहे.
मुंबई : म्हाडा भवनाचा कायापालट, दीड कोटी खर्च करून सुशोभिकरण, लवकरच निविदा
राज्यभरात घरांची निर्मिती करून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देण्याची जबाबदारी म्हाडावर आहे.
महाराष्ट्रात झाल्या २५ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया!
मुंबई : ‘पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत योजने’ अंतर्गत राज्यात तीन वर्षात २७ लाख ९५ हजार २०० मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी गेल्या तीन वर्षात ९१ टक्के उद्दिष्ट साध्य करत सार्वजनिक आरोग्य विभागाने २५,६९,७५३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या ‘बी.कॉम. सत्र ६’ची उद्यापासून परीक्षा, एकूण २८४ परीक्षा केंद्रावर ५४ हजार ८९२ विद्यार्थी देणार परीक्षा
‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसह स्वयंअर्थसहाय्यित बीएएमएस, अकाऊंटिंग फायनान्स आणि बँकिंग अँड इन्शुअरन्ससह इतरही अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे.
तोंडात टॉवेल कोंबून पत्नीची हत्या करणारा आरोपी अटकेत
ती आरडाओरडा करू लागल्यानंतर त्याने रेखाच्या तोंडात टॉवेल कोंबला आणि तिला मारहाण केली.
दहिसरमधील पर्यायी जागा घेण्यास देवनारच्या दुकानदारांचा नकार
मुंबई: गेल्या ४० वर्षांपासून देवनार परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांवर पालिकेच्या एम पूर्व विभागाने तोडक कारवाई केली असून ही दुकाने जमीनदोस्त झाली आहेत. पालिकेने या दुकानदारांना दहिसर येथे पर्यायी जागा दिली आहे. मात्र आम्हाला याच परिसरात दुकाने द्यावीत, अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे.
जानेवारी २०११ पूर्वी झोपडीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केलेल्यांना राज्य सरकारचा दिलासा; झोपडीच्या हस्तांतरणासाठी पुन्हा अभय योजना
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत परिशिष्ट -२ अंतिम झालेल्या, मात्र विविध कारणांमुळे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकाकडून खरेदी केलेली झोपडी नावावर होत नसल्याने अनेकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता अशा झोपड्यांचे हस्तांतरण सुलभपणे व्हावे यासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये तीन महिन्यांची अभय योजना राबविली होती.
वाढत्या उन्हाचा पक्ष्यांनाही फटका; १६ दिवसांमध्ये ५८ पक्षी तर तीन श्वान जखमी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने मुंबईकर हैराण झालेले असताना आता पशु-पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये उन्हाच्या तडाख्यात पक्षी जखमी होण्याच्या घटनेत पाचपटीने वाढ झाली आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईत ५७ पक्षी आणि तीन श्वान जखमी झाले आहेत.
तोंडात टॉवेल कोंबून पत्नीची हत्या करणारा आरोपी अटकेत
मुंबई : कौटुंबिक वादातून पत्नीच्या तोंडात टॉवेल कोंबून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. रेखा खातून ऊर्फ राबीया शेख (२३) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी तिचा पती रॉयल शेखविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीची हत्या करून रॉयल पळून गेला होता.
कामा रुग्णालयात अतिविशेषोपचार युरोगायनॅक अभ्यासक्रम ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता
मुंबई : मूत्राशयासंदर्भात विविध आजारांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या युरोगायनॅक या विषयावरील अतिविशेषोपचार अभ्यासक्रम कामा रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे सरकारी रुग्णालयामध्ये मूत्राशयाचा संसर्ग, लघवीची नळी, गर्भाशयासंदर्भातील शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
जेसीबी अंगावरून गेल्यामुळे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई : विलेपार्ले येथे रस्त्यावर काम सुरू असताना जेसीबी अंगावरून गेल्यामुळे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जेसीबी मागे घेत असताना हा अपघात झाला. त्यानंतर चालक व क्लिनर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. सीसी टीव्हीची चित्रीकरणामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. अखेर जुहू पोलिसांनी जेसीबी चालक व क्लिनरचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.
पालिका शाळेतील विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीन
मुंबई : पालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक आणि जैव विघटनशील सॅनिटरी नॅपकीन पुरविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना दर महिन्याला २० सॅनिटरी नॅपकीन देण्याची सूचना खासदार पीयूष गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली आहे.
‘आरबीएसके’अंतर्गत रुग्णालयातच उपचार करा ! आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा चिकित्सकांना आदेश
मुंबई : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत (आरबीएसके) शालेय विद्यार्थ्यांवर विविध उपचार मोफत केले जातात. मात्र, अनेक वेळा या रुग्णांना उपचारासाठी अन्य विभागात पाठवण्यात येते. यामुळे रुग्ण व त्याच्या पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता आरोग्य सेवा संचालनालयाने ‘आरबीएसके’अंतर्गत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या रुग्ण राहत असलेल्या विभागातच करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा चिकित्सकांना दिल्या आहेत.
अंधेरीत झाडांच्या बुंध्यांलगत सिमेंट काँक्रीटीकरण?
मुंबई : अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयानजीकच्या रस्त्यावर पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक झाडांच्या बुंध्यांशी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काँक्रीटीकरणामुळे झाडांची वाढ खुंटत असून ती सुकण्याचीही शक्यता असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
चक्क सीबीआय संचालकांच्या नावाने फसवणुकीसाठी मेल! बळी न पडण्याचे आवाहन
मुंबई : येनकेन प्रकारे सायबर फसवणुकीला बळी पाडण्यासाठी आता भामट्यांनी केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) संचालक प्रवीण सूद यांच्या नावाचा गैरवापर करत मेल पाठविण्यास सुरवात केली आहे.
हायब्रिड मार्गिका १ एप्रिलपासून बंद; फास्टॅगद्वारे पथकर वसुलीसाठी एमएसआरडीसी सज्ज
मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून राज्यभरातील महामार्ग, शीघ्रसंचार महामार्ग, सागरी सेतूवरील पथकर नाक्यांवर फास्टॅगद्वारेच पथकर वसूल करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सज्ज झाले आहे. एमएसआरडीसीच्या अखत्यारितील ९ रस्ते प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व पथकर नाक्यांवरील मार्गिकांचे फास्टॅग मार्गिकेत रुपांतर करण्यात आले आहे.
मुंबई लाईव्ह