Latest News in Mumbai Today : त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयास शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी विरोध दर्शविला आहे. तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तर मुंबई मेट्रो ३ ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. एमएमआरसीकडून आरे – बीकेसी आणि बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. या चाचण्यांसाठी आरे – बीकेसी मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रका बदल करण्यात आला आहे. तेव्हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.

Live Updates

Mumbai Maharashtra News LIVE Today, 18 April 2025

22:43 (IST) 18 Apr 2025

बाजार समित्यांच्या धोरणाबाबत महागोंधळ, ३०६ पैकी ९७ बाजार समित्या तोट्यात; नियमन मुक्तीला हरताळ

राज्यातील ३०६ पैकी ९७ बाजार समित्या तोट्यात आहेत. अद्याप ३० बाजार समित्यांना स्वः मालकीची जागा नाही. ८१ बाजार समित्यांमध्ये पायाभूत सोयी - सुविधा नाहीत. ६२१ उपबाजार आवारांचा विकास झालेला नाही. ...सविस्तर बातमी
19:57 (IST) 18 Apr 2025

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, पीसीएम गटातून चार लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

एमएचटी सीईटीच्या दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ...अधिक वाचा
19:17 (IST) 18 Apr 2025

मधुमेह असलेल्या तरुणांमधील यकृताच्या समस्यांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ! शनिवारी जागतिक यकृत दिन

गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये विशेषतः टाइप २ मधुमेह असलेल्यांना हिपॅटायटीस, फॅटी लिव्हर आणि सिरोसिससारखे यकृताचे आजार होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ...अधिक वाचा
18:00 (IST) 18 Apr 2025

वाढत्या तापमानामुळे मुंबईकर त्वचाविकाराने त्रस्त, महिनाभरात ३० टक्क्यांनी रुग्ण वाढले

मागील काही दिवसांपासून मुंबईमधील तापमानात सातत्याने वाढ होत असून वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण झाले आहेत. घामामुळे नागरिकांना त्वचाविकाराचा त्रास सहन करावा लागत आहे. ...वाचा सविस्तर
17:51 (IST) 18 Apr 2025

रस्ते कामातील घोटाळे शोधण्यासाठी पालिकेने पथक सज्ज करावे, मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी

रस्ते कामातील घोटाळे शोधण्यासाठी पालिकेने पथक सज्ज करावे, मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी ...सविस्तर बातमी
17:36 (IST) 18 Apr 2025

एमएचटी सीईटीच्या पहिल्या टप्प्यात ९३.९१ टक्के विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, पीसीबी गटासाठी घेतलेल्या परीक्षेला २ लाख ८२ हजार विद्यार्थी उपस्थिती

एमएचटी-सीईटीच्या पहिला टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी घेण्यात आलेली परीक्षा १७ एप्रिल रोजी पार पडली. ...अधिक वाचा
17:27 (IST) 18 Apr 2025

…खोट्या बातम्या पसरवणाऱ्या वृत्तीला श्रद्धांजली, आदेश बांदेकर नेमके काय म्हणाले ?…

समाजमाध्यमांवर एक चित्रफित अपलोड करीत आदेश बांदेकर यांनी खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ...सविस्तर वाचा
17:25 (IST) 18 Apr 2025

मुंबईकरांना जलतरणाचे धडे…लवकरच सुरू होणार नावनोंदणी, अन्य ९ जलतरण तलावांचे सभासदत्वही घेता येणार

मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
17:08 (IST) 18 Apr 2025

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

मुंबई : चेंबूर परिसरात गुरुवारी सायंकाळी भरधाव वेगात धावणाऱ्या एका टँकरने दुचाकीस्वराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून चालकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नवी मुंबई येथील कोपरखैरणे परिसरात वास्तव्यास असलेला मदनलाल कुमावत (३४) गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास दुचाकीवरून वडाळ्याच्या दिशेने जात होता. चेंबूरमधील पांजरापोळ परिसरातून जात असताना त्याच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या टँकरने धडक दिली. या अपघातात मदनलाल गंभीर जखमी झाला.

त्याच्या उजव्या पायावरून टँकरचे चाक केले. या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना अपघाती माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला नवी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मदनलालच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी टँकर चालक मयूर बेले (३२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

17:04 (IST) 18 Apr 2025

‘एमजेपीजेएवाय’च्या अमलबजावणीत गैरप्रकार सहन केला जाणार नाही, आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईमधील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्यालयात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने’च्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला. ...अधिक वाचा
16:54 (IST) 18 Apr 2025

उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची वाढती गर्दी डोकेदुखी…मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय…

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
16:00 (IST) 18 Apr 2025

म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाचा पहिला जनता दरबार…

तक्रारी, समस्या मांडून त्यांचे निराकरण करून घेण्याची संधी उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू आणि संक्रमण शिबिरार्थींनी उपलब्ध होणार आहे. ...अधिक वाचा
15:02 (IST) 18 Apr 2025

चालत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग… सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या पडताळणीनंतर तरुणाला अटक

चालत्या बसमध्ये २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. ...सविस्तर बातमी
14:57 (IST) 18 Apr 2025

बनावट कागदपत्रे… ५५ क्रेडिट कार्ड… आणि सव्वा कोटींची फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून ५५ क्रेडिट कार्ड घेऊन एक कोटी २६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने बेड्या ठोकल्या. ...सविस्तर वाचा
13:02 (IST) 18 Apr 2025

कबुतरखान्याचा मुद्दा मुंबई महापालिका अधिकाऱ्याच्या बदलीमुळे अडगळीत!

दादरचा सुप्रसिद्ध कबुतरखाना आणि अन्य ठिकाणचे अनधिकृत कबुतरखाने हटविण्याच्या मागणीवर मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ...अधिक वाचा
13:02 (IST) 18 Apr 2025

‘ऑपरेशन शोध’… मुंबई पोलिसांची विशेष मोहीम…

मुंबई पोलिसांनी हरवलेली मुले आणि महिलांना शोधून काढण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...वाचा सविस्तर
11:28 (IST) 18 Apr 2025

Raj Thackeray : "मराठी माणसाच्या अस्तित्त्वावर वरवंटा फिरवून...", राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...

शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. आता यावर राज ठाकरे यांनीही रोखठोक भूमिका मांडली आहे. ...वाचा सविस्तर
10:10 (IST) 18 Apr 2025

रस्त्याच्या कामात झाडे बाधित होत असल्यास रस्त्याचे आरेखन बदलावे, बोरिवलीतील एल. आय. सी. वसाहतीतील रस्त्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

बोरिवली पश्चिम येथील अय्यप्पा मंदिर मार्गाच्या काँक्रिट कामात झाडे बाधित होत असून ही झाडे वाचवण्यासाठी रस्त्याचे संरेखन सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभीजीत बांगर यांनी दिले. ...वाचा सविस्तर
10:10 (IST) 18 Apr 2025

हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्यांचा पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, कुर्ल्यातील घटना

खेळणाऱ्या मुलांना बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या चौघांनी १७ वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी कुर्ल्यात घडली. ...सविस्तर वाचा
10:10 (IST) 18 Apr 2025

आरेच्या जंगलात सोडले २० भटके श्वान... तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरूच

काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे आरेच्या जंगलात सोडण्यात आलेल्या कांदिवलीतील भटक्या श्वानांच्या बचावासाठी हाती घेतलेली शोध मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. ...अधिक वाचा
10:08 (IST) 18 Apr 2025

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; आज सेवा उशिरा सुरू होणार, 'या' वेळेतच प्रवासाचं करा नियोजन

Mumbai Metro Latest Updates : मुंबई मेट्रोने यासंदर्भातील मााहिती एक्सवर पोस्ट केली आहे. ...अधिक वाचा
10:07 (IST) 18 Apr 2025

हिंदी सक्तीला विरोध, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाचा समावेश करण्याचा आदेश सरकारने काढला. ...अधिक वाचा

 

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स