Mumbai News LIVE Updates : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरात रोज कोट्यवधींच्या आर्थिक उलाढाली होत असतात तसेच अनेक घडामोडी घडत असतात. शहरात घडणाऱ्या महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी, क्राईम, हवामान तसेच राजकीय घडमोडींसंबंधिचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेणार आहोत…
Mumbai Maharashtra News LIVE Today 18 March 2025
माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाचाही दिलासा; नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे चार घरे लाटण्याच्या प्रकरणात २० फेब्रुवारी रोजी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मिडीआ’ नाटक प्रथम; ‘मून विदाउट स्काय’ द्वितीय आणि ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ नाटक तृतीय
हौशी कलाकार व तंत्रज्ञांमधील कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे’ आयोजन करण्यात येते. सविस्तर वाचा…
ठाणे- बोरिवली दुहेरी भूमिगत बोगदा प्रकल्पाचा मार्ग मोकळा; बनावट बँक हमीचा दावा करणारी याचिका फेटाळली
ठाणे आणि बोरिवलीदरम्यान दुहेरी भुयारी बोगद्याच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बॅंकेचे बनावट हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.
सीमावर्ती भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम; मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे एक पाऊल पुढे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक मदत यशस्वीपणे पोहचवली जाते. सविस्तर वाचा…
जैन यात्रेसाठी भारत गौरव टुरिझम ही विशेष रेल्वेगाडी धावणार
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) जैन समुदायाच्या पर्यटकांसाठी अनोखी योजना आखली आहे. आयआरसीटीसीने देशभरातील जैन मंदिरे, धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ही योजना तयार केली आहे. सविस्तर वाचा…
कांजूरमार्ग येथील जागा केंद्राकडून आधीच राज्य सरकारला उपलब्ध; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेली कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा केंद्र सरकारने आधीच राज्य सरकारला उपलब्ध केली आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली.
लाच प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांना अटकपूर्व जामीन नाहीच; उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार
जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने फेटाळली. सविस्तर वाचा…
नागरिकांची पायपीट थांबणार, म्हाडाचे नागरी सुविधा केंद्र एप्रिलमध्ये सेवेत
मुंबई : म्हाडाच्या वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयाच्या आवारात मुंबई मंडळ नागरी सुविधा केंद्र उभारत आहे. या नागरी सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून एप्रिलमध्ये हे नागरी सुविधा केंद्र सेवेत दाखल होणार आहे. हे सुविधा केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना आपली निवेदने, पत्र, तक्रारी वा इतर कागदपत्रे एकाच ठिकाणी जमा करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे.
मुंबई : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबई : पवई येथे टेम्पोने दिलेल्या धडकेत ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे धडक दिल्यानंतर आरोपी टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराला कोणतीही मदत न करता तेथून पलायन केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
शाळा परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई, आतापर्यंत ५०९ जणांवर गुन्हे
मुंबई : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीस बंदी आहे. असे असतानाही सर्रास विक्री होत असल्याने पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘परिमंडळ ७’ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण ५०९ जणांविरोधात कारवाई केली.
रस्ते काम झाडांच्या मुळावर! तब्बल २४१३ झाडांचे नुकसान
मुंबई : रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मुंबईकर त्रासलेले असतानाच झाडांचेही खूप नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करताना संपूर्ण मुंबईत आतापर्यंत २४१३ झाडांच्या मुळाना धक्का लागला आहे.
‘न्यू इंडिया’प्रकरणी आणखी एक अटकेत
मुंबईः ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी जावेद आझम या ४८ वर्षीय व्यावसायिकाला सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
‘टोरेस’प्रकरणी आरोपपत्र दाखल; १४,१५७ गुंतवणूकदारांची १४२.५८ कोटींची फसवणूक
मुंबई : टोरेस गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी आठ आरोपींविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. २७ हजार १४७ पानांच्या या आरोपपत्रात १४ हजार १५७ गुंतणुकदारांनी तक्रार केली असून त्यांची १४२ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिका