Latest News in Mumbai Today : मुंबई शहर आणि उपनगरांतील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती तसेच राजकीय घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या आणि महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 19 March 2025
मुंबईतून २८६ किलो गांजा जप्त; वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाची कारवाई
गुन्हे शाखेने वांद्रे परिसरात केलेल्या कारवाईत २८६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली. सविस्तर वाचा…
झोपडीधारकांना मोफत घरे उपलब्ध करणे अयोग्य; सरकारच्या धोरणावर उच्च न्यायालयाचे पुन्हा एकदा बोट
झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेंतर्गत झोपडीधारकांना मोफत घरे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. तसेच, झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना त्यांना मोफत घरे उपलब्ध करण्याऐवजी त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम आकारण्याची गरज न्यायालयाने बोलून दाखवली. सविस्तर वाचा
केईएम रुग्णालयासमोर शिवसेनेचे (ठाकरे) आंदोलन; इंग्रजी भाषेतील कमानीला काळे फासले
शिवसेनेने (ठाकरे) बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयासमोर आंदोलन केले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील इंग्रजी भाषेतील कमान हटवावी या मागणीसाठी शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी कमानीला काळे फासून निषेध व्यक्त केला. सविस्तर वाचा…
नीट पीजी २०२५ परीक्षा दोन सत्रात घेण्यास डॉक्टरांचा विरोध
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट पीजी परीक्षा यंदा दोन सत्रामध्ये घेण्याचा निर्णय वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतला आहे. सविस्तर वाचा
प्रियकर आणि दोन मित्रांसह पतीच्या हत्येचा रचला कट; महिलेसह साथीदाराला अटक, दोघे फरार
पतीची हत्या केल्याप्रकरणी गोरगाव येथील २८ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तिने आपला प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केली. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला. सविस्तर वाचा…
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचा गुरुवारीच निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे कुटुंब न्यायालयाला आदेश
हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटापूर्वी बंधनकारक असलेला सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची विभक्त पत्नी धनश्री वर्मा यांनी केलेली मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केली. सविस्तर वाचा…
परिचारिका अभ्यासक्रमाच्या अर्जात दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यांना संधी; २१ मार्चपर्यंत करता येणार बदल
परिचारिका संवर्गाच्या विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या तपशीलात बदल करण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उपलब्ध करून दिली आहे. सविस्तर वाचा…
झोपु योजनेत स्वयंचलित प्रक्रियेद्वारे पात्रता! राज्य शासनाकडून अधिकृत आदेश जारी
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने विकसित केलेली स्वयंचलित प्रक्रिया आता सर्वच सक्षम यंत्रणांना वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
उच्च रक्तदाब, हृदयविकारावर चुंबकीय उपचार; आयआयटी मुंबईतील संशोधकांना उपचार पद्धती शोधण्यात यश
काही वर्षांपासून उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा…
मुंबई : अभिनेत्रीच्या घरातून दागिने चोरीला
मुंबईः अभिनेत्री करूणा वर्मा यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार केली आहे. तक्रारीत घरात ठेवलेल्या चार बांगड्या चोरलीला गेल्या असून त्यांनी घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ठाकरेच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत (शिंदे) प्रवेश
मुंबई : शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर ठाकरे गटातून शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी देखील मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.
मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करापोटी ५३९२ कोटींची वसुली
मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने ५३९२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. करवसुलीचे उद्दिष्टय गाठण्यास अजून ८०० कोटींची तूट आहे. एकूण उद्दिष्ट्याच्या ८७ टक्के करवसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.
मुंबईकरांनो, आता मिळणार दिलासा
मुंबई : मागील दोन दिवसांपासून उन्हाचे चटके आणि उष्मा काहीसा कमी झाला आहे. तसेच चाळिशीच्या आसपास पोहोचलेला तापमानाचा पारा आता थेट ३२ अंशावर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबई न्यूज