Latest News in Mumbai Today : देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ताज्या घडामोडींची माहिती या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थलांतर झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून ताज्या बातम्या जाणून घ्या…

Live Updates
मुंबई न्यूज अपडेट्स

Mumbai LIve News Updates 20th March 2025

21:38 (IST) 20 Mar 2025

इन्स्टाग्रामवर चर्चेत येण्यासाठी राहण्यासाठी वाट्टेल ते…परदेशी इन्फ्लूएंजरविरुद्ध तक्रार

पवई येथील गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल नजीकच्या साई सॅफायर या २२ मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावर गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. आग आणि धुरामुळे इमारतीत अडकलेल्या ५० ते ६० रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. सविस्तर वाचा…

21:28 (IST) 20 Mar 2025

अंधेरी एमआयडीसीमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाचे आठ पाण्याचे ट्रॅंकर घटनास्थळी

पवई येथील आग विझत नाही तोपर्यंत मुंबईत गुरुवारी अंधेरी परिसरातही आग लागल्याची घटना घडली. अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. सविस्तर वाचा

21:28 (IST) 20 Mar 2025

मादागास्करमधील वृद्धाला मुंबईतील मसीना रुग्णालयात स्टेंट ड्राफ्टिंग करून जीवनदान!

साध्या अपघातामुळे सुरू झालेल्या वेदनांनी ७० वर्षीय मादागास्करच्या रुग्णाला जीवघेण्या आजाराची चाहूल लागली. दोन महिन्यांहून अधिक काळ असह्य पोटदुखी सहन केल्यानंतर रुग्ण थेट मादागास्कर येथून मुंबईच्या मसीना रुग्णालयातउपचारासाठी दाखल झाले. तेथे त्यांच्यावर यशस्वी स्टेंट ग्राफ्टिंग उपचार करण्यात आला. सविस्तर वाचा

21:27 (IST) 20 Mar 2025

‘छावा’ १८१८ बेकायदा लिंक इंटरनेटवर उपलब्ध; मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. मात्र, या चित्रपटाच्या १८१८ बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या असून याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा

21:26 (IST) 20 Mar 2025

बदलापूरवासियांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण; कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका मार्गी लागणार

मुंबई आणि बदलापूरला मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका प्रस्तावित केली असून ३८ किमीची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे. सविस्तर वाचा

21:26 (IST) 20 Mar 2025

मीठ चौकी पुलावरून दर दिवशी ६० हजार वाहनांचा प्रवास

मालाड येथील मीठ चौकी उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना थोडासा दिला मिळाला असून हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला होऊन दोन महिने झाले आहेत. दर दिवशी या उड्डाणपूलावरून सरासरी ६० हजार वाहने प्रवास करत आहेत. सविस्तर वाचा

14:05 (IST) 20 Mar 2025

सागरी किनारी मार्गाच्या पुढील टप्प्याचे कामही लवकरच सुरू होणार… भूसंपादनाच्या पूर्वप्रक्रियेला सुरुवात, ६१ भूखंड बाधित होणार

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता पूर्णतः खुला झाला आहे.

सविस्तर वाचा…

14:04 (IST) 20 Mar 2025

शिवसेना (शिंदे) पक्षाची पालिका आयुक्तांकडे तक्रार, सततच्या रस्ते कामामुळे नागरिकांना मनस्ताप

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते आहे.

सविस्तर वाचा…

14:03 (IST) 20 Mar 2025

शहरी नक्षलवाद प्रकरण : “व्याख्यानांसाठी परदेशात जाण्याची परवानगी द्या”, मागणीसाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांची उच्च न्यायालयात याचिका

उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला होता. तसेच, तो मंजूर करताना त्यांच्यावर प्रवासाशी संबंधित निर्बंध लादले होते.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 20 Mar 2025

मुंबई : आता ‘या’ रस्त्यावरही आत्महत्या, मोटरगाडी उभी करून समुद्रात उडी मारली

तरूणाने समुद्रात उडी मारण्यापूर्वी कोणती चिठ्ठी लिहिलेली अद्याप सापडलेली नाही. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 20 Mar 2025

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प : कंपनीचे ११६ कोटी रुपये विकासकांनी थकवले! संक्रमण शिबिरांचे भाडे देण्यास हयगय

भरमसाट व्याज आकारण्यात आल्याचा दावा करीत विकासकांनी थकबाकी देण्यास टाळाटाळ केली आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजीज शेख यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 20 Mar 2025

मुंबई : …आणखी ९ हजार ९०० झाडांवर कुऱ्हाड

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिका बांधली जात आहे.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 20 Mar 2025

मुंबईतून कोकणात जाणासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या धावणार उन्हाळी सुट्ट्यानिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्या

उन्हाळी सुट्ट्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा…

11:56 (IST) 20 Mar 2025

मुंबई : समाजमाध्यमांवरील १४० पोस्ट हटवल्या

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 20 Mar 2025

मुंबई : पवईतील बहुमजली इमारतीला आग

सतराव्या मजल्यावर गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास अचानक आग लागली असून आगीची तीव्रता सातत्याने वाढत आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स