Latest News in Mumbai Today : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी टाळी देणार अशी चर्चा सुरू झाली असताना या दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या काँक्रीटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचे उत्तर येत्या पावसाळ्यातच मिळू शकणार आहे. मुंबई अशा विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल….
Mumbai Maharashtra News, 21 April 2025
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट
मुंबई: समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या एका रिक्षाचालकाला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. मौला मुल्ला (२८) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ही पोस्ट टाकली होती. ट्रॉम्बे पोलिसांपर्यंत ही पोस्ट पोहचताच त्यांनी तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याचदरम्यान ही पोस्ट टाकणारा आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई : शीव उड्डाणपुलाचे पाडकाम वेगात, मोडकळीस आलेल्या सात तुळया काढल्या
आमदाराच्या नावाने सायबर फसवणुकीचा प्रयत्न, जुहू पोलिसांनी केला गुन्हा दाखल
विलेपार्ले येथील जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर तूर्त पाडकाम कारवाई नको - उच्च न्यायालय
मुंबई : पालिकेची वृक्षछाटणी अयोग्य, पर्यावरणप्रेमींचा आरोप
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण : मृत महिलेच्या कुटुंबियांची एमएमसीकडून सुनावणी, डॉ. घैसास यांची लवकरच होणार सुनावणी
निर्जलीकरण झालेल्या ९० पशु-पक्ष्यांना जीवदान
अल्पवयीन मुलीचे विरारमधून अपहरण करून अत्याचार, आरोपी अटकेत
अटकेची भीती दाखवून ग्राफीक डिझायनरची सायबर फसवणूक
मुंबईकरांनो सावध! … मंगळवारी उष्णता आणि दमटपणाचा इशारा
अभ्युदयनगरवासियांना अखेर २५ हजार रुपये घरभाडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली घरभाड्यात वाढ
शासकीय भूखंडाची खासगी ट्रस्टकडून विक्री… ट्रस्टला ५३९ कोटी, शासनाला ५१ कोटी!
थकबाकी १ लाख कोटी
मुंबई : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून झालेल्या ‘मोफत’च्या घोषणा, याच काळात वीज थकबाकी वसुलीकडे ‘महावितरण’चे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे सर्व ग्राहकांच्या वीज बिलाची थकबाकी तब्बल ९८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. धक्कादायक म्हणजे यात एकट्या कृषीपंपांच्या बिलांची थकबाकी ७५ हजार कोटींहून अधिक आहे. थकबाकीचा आकडा फुगत चालला असून, त्याने एक लाख कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला असल्याचे उच्चपदस्थांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
यंदाही मुंबईकरांच्या माथी खड्डेच… पण खर्च मात्र कमी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी टाळी देणार अशी चर्चा सुरू झाली असताना या दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे.
सोडतीतील विजेते, म्हाडाच्या रहिवाशांना तक्रारींचा पाढा वाजता येणार…म्हाडाच्या मुंबई मंडळचा पहिला जनता दरबार बुधवारी
मुंबई : म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने बुधवार, २३ एप्रिल रोजी पहिला जनता दरबार आयोजित केला आहे. सोडतीतील विजेत्यांपासून ते म्हाडा वसाहतीतील रहिवाशांपर्यंत सर्वांना जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या, तक्रारी थेट मुख्य अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स