Latest News in Mumbai Today : महाराष्ट्राची राजधानी तसंच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील घडमोडींकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. मनोरंजन क्षेत्र, राजकारण यामध्ये काय घडत आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. याचबरोबर वाहतूक, मुंबईची लाईफ लाईन लोकलशी संबंधित बातम्या, न्यायालयीन घडामोडी, गुन्हे वृत्त, महानगरपालिकेशी संबंधित बातम्या अशा सर्व घडामोडिंची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Mumbai Maharashtra News Today, 21 march 2025

16:40 (IST) 21 Mar 2025

Devendra Fadnavis: पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तिघांमध्ये चौथा भिडू म्हणून राज ठाकरेंचा मनसे सहभागी होऊ शकतो अशा चर्चेला सध्या उधाण आलं आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नसल्याचे सूतोवाच देवेंद्र फडवीसांनी यावेळी केले.

सविस्तर बातमी...

16:16 (IST) 21 Mar 2025

Laxmi Nivas Bungalow: मुंबईतील ऐतिहासिक लक्ष्मी निवास बंगल्याची २७६ कोटींना विक्री, कोण आहेत नवे मालक?

Laxmi Nivas Bungalow Sold: या लक्ष्मी निवास बंगल्याचे मालक असलेल्या कपाडिया कुटुंबाने १९,८९१ चौरस फूटाचा हा बंगला मुंबईस्थित वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला विकला आहे.

सविस्तर वाचा...

16:14 (IST) 21 Mar 2025

Devendra Fadnavis: दिशा सालियन प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले देवेंद्र फडणवीस; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: दिशा सालियन हत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 21 Mar 2025

अधिवास प्रमाणपत्रासाठी दोन महिन्यांची प्रतिक्षा, दलालांकडून मात्र दोन दिवसांत प्रमाणपत्र उपलब्ध

राज्यातील रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र मागितले जाते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो.

सविस्तर वाचा...

13:36 (IST) 21 Mar 2025

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी सराव चाचणी उपलब्ध, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून हॉटेल मॅनेजमेंट, बीएड आणि एमसीएसाठी विद्यार्थ्यांची सोय

हॉटेल मॅनेजमेंट, बीएड आणि एमसीए या विषयांसाठीच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सराव चाचणी (मॉक टेस्ट) उपलब्ध करून दिल्या आहेत.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 21 Mar 2025

मुंबईतील रुग्णालयाचे डॉक्टर देणार जगातील डॉक्टरांना प्रशिक्षण

टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णांवरील उपचाराचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव अन्य देशातील डॉक्टरांना मार्गदर्शक ठरावा यासाठी टाटा रुग्णालय व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:47 (IST) 21 Mar 2025

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी करण्याविरोधात डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांची उच्च न्यायालयात धाव

दरम्यान, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघींवर डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 21 Mar 2025

घाटकोपर दुर्घटनेतील आणखी एका आरोपीला जामीन

घाटकोपर येथील पेट्रोल पंपजावळ असलेले सुमारे १०० फुटांचं महाकाय फलक पेट्रोलपंपावर कोसळले आणि त्यात १७ जणांचा मृत्यू झाला, तर ७० जण जखमी झाले.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 21 Mar 2025

रिक्षा, टॅक्सी चालकांनी भाडे नाकारले? आता व्हॉट्सॲपवर तक्रार करता येणार…

मुंबई महानगर भागातील प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी आणि अॅप आधारित कॅबमुळे गैरसोय झाल्यास थेट व्हाॅट्सअॅपवर तक्रार करता येईल. त्यानंतर संबंधित चालकाविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

वाचा सविस्तर...

12:39 (IST) 21 Mar 2025

सराफाच्या कार्यालयात इंटेलिजन्स ब्यूरोचा छापा, ११ लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना पकडले

मुंबईः दक्षिण मुंबईतील सराफाच्या कार्यालयात इंटेलिजन्स ब्यूरो, दिल्लीच्या नावाने छापा टाकण्यात आला. व्यावसायिकाकडून ११ लाख ५० हजार रुपये घेऊन पळालेल्या चार तोतया अधिकाऱ्यांना २४ तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर बातमी...

12:38 (IST) 21 Mar 2025

घाटकोपर ते विक्रोळी आणि अंधेरी ते कांदिवली… रस्ते होणार चकाचक

मुंबई : पूर्व दृतगती मार्गावरील घाटकोपर ते विक्रोळी आणि पश्चिम दृतगती मार्गावरील अंधेरी ते कांदिवली या भागात मुंबई महानगर पालिकेतर्फे आज रात्री स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तर शनिवारी रात्री विक्रोळी ते मुलुंड चेक नाका आणि कांदिवली ते दहिसर चेक नाका या भागाची स्वच्छता केली जाणार आहे.

सविस्तर बातमी...

12:37 (IST) 21 Mar 2025

महाव्यवस्थापकाची ‘ब्रेन मॅपिंग’, न्यू इंडिया बँक १२२ कोटी अपहार प्रकरण

मुंबई : ‘न्यू इंडिया को-ऑप. बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या पॉलिग्राफी चाचणीत विशेष माहिती न मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर बातमी...

 

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader