Latest News in Mumbai Today : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. विधिमंडळ अधिवेशनातही कुणाल कामराबद्दलचा मुद्दा गाजत आहे. अशा राजकीय घडामोडी तसंच मुंबईतील वाहतुकीचे अपडेट्स, गुन्हे आणि न्यायालयीन घडामोडींची माहिती, महानगरपालिका तसंच वाहतुकीचे अपडेट्स आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येतील…

Live Updates

Mumbai Maharashtra News Today, 24 march 2025

16:48 (IST) 24 Mar 2025

सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला, रिलायन्ससह ‘या’ १० शेअर्सची भरारी

अनेक दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार आता रुळावर आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेअर बाजार गेल्या आठवड्यात ३,०७७ अंकांनी वधारल्यानंतर या आठवड्यातही चांगली सुरुवात झाली आहे.

सविस्तर बातमी...

16:13 (IST) 24 Mar 2025
“…मग मलिष्काचं गाणं का झोंबलं होतं?”, कुणाल कामरा प्रकरणावरून शिंदे गटाच्या महिला नेत्याचा आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न!

आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराचं समर्थन केल्याचं विचारल्यावर मनीषा कायंदे म्हणाल्या, “मग मलिष्काने गाणं केलं होतं तेव्हा तुम्हाला का झोंबलं होतं? तेव्हा मिर्च्या का लागल्या. कंगना रणौत हिचं घर तोडलं होतं, ते का तोडलं होतं? याचं उत्तर द्यावं. कुणाल भामट्यामागे तुम्हीच आहात याचा तुम्हीच पुरावा देत आहात.”

सविस्तर बातमी...

15:31 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा प्रकरणानंतर मुंबईतील ‘दी हॅबिटॅट’ स्टुडिओ बंद; व्यवस्थापक म्हणाले, “आम्हाला धक्का बसलाय”!

मुंबई : कुणाल कामराचा हा शो झालेल्या स्टुडिओच्या चालकांनी तो स्टुडिओच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर त्यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या गाण्याचे विधानसभेत तीव्र पडसाद; मुख्यमंत्री म्हणाले, “या कामराला माहिती पाहिजे की…”

कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवेदन केलं. “कुणीही अभिव्यक्ती करू नये असं आपलं म्हणणं नाही. हास्य, व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. राजकीय व्यंग झालं तरी आपण त्याला दुसरी कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण ते स्वैराचाराकडे जाणारं असेल, तर ते मान्य होणारं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सविस्तर वाचा...

14:11 (IST) 24 Mar 2025

Anjali Damania : “याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR शिंदे गटाच्या…”, अंजली दमानियांनी केली ‘ही’ मागणी

Anjali Damania On Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांकडून करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 24 Mar 2025

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे.शिवसैनिकांनी खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिवसेनेकडून(शिंदे गट) एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामराविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 24 Mar 2025

विद्याविहार येथील इमारतीला भीषण आग; ४३ वर्षीय सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू, एकजण जखमी

मुंबई : विद्याविहार येथील नाथानी मार्गावरील नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्सला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील सुरक्षारक्षक उदय गांगण (४३) यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य एक सुरक्षा रक्षक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी प्रयत्न करत आहेत.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 24 Mar 2025

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे.

सविस्तर बातमी...

13:04 (IST) 24 Mar 2025

Shivneri Bus : बस चालवताना मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहणं पडलं महागात, बस चालकावर झाली मोठी कारवाई

Mumbai Pune E Shivneri Bus : एका बस चालकाला बस चालवताना मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहणं चांगलचं महागात पडलं आहे. या बस चालकावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठी कारवाई केली आहे.

सविस्तर बातमी...

13:03 (IST) 24 Mar 2025

कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणारे २० जण ताब्यात

मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने तोडफोड केली आहे. खार पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात स्टुडिओमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी...

13:02 (IST) 24 Mar 2025

शंभर दिवसांत ४० हजार क्षयरुग्ण; ७ लाख ५४ हजार संशयित क्षयरुग्णांची तपासणी

मुंबई : राज्यात राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस क्षयरुग्ण शोध मोहीम’अंतर्गत ४० हजार ४७१ क्षयरुग्ण सापडले. क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक १७ ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात व १३ महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली होती.

वाचा सविस्तर...

Mumbai News Today in Marathi