Latest News in Mumbai Today Live : महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो. राज्याचे प्रशासकीय मुख्यालय मंत्रायलय मुंबईत आहेच पण त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today
यंदाच्या नालेसफाईत मुंबई महापालिकेने घातली महत्त्वपूर्ण अट, रस्त्याच्या कडेच्या गटारामधील गाळ काढण्याचेही चित्रीकरण होणार
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात.
माथाडी कामगारांच्या विशेष गृहनिर्माणासाठी राखीव असलेल्या कांदिवली पश्चिम येथील २७ एकर भूखंडाच्या वापरातील अनियमिततेबाबत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर राज्य शासनाने निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी निर्णय घेऊन अनियमितता रद्द केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
कर्करोगावरील संशोधनात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली जोगेश्वरी येथील महिलेची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
स्वयंपुनर्विकासात अडथळा आणल्यास नोकरीवर गदा!
स्वयंपुनर्विकासाला परवानगी देताना सरकारी यंत्रणेकडून येणारे अडथळे, गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यापूर्वी असे प्रकार निदर्शनास आल्यावर कठोर कारवाई केली होती.
बोरिवलीत रस्त्यांची धूळधाण, काँक्रीटीकरण कामांची संथगती; खोदलेल्या रस्त्यांमुळे स्थानिकांची प्रचंड गैरसोय
महानगरपालिकेने दोन टप्प्यात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. अनेक ठिकाणी कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही कामे संथ गतीने सुरू आहेत.
बेपर्वाईमुळे रोगराईचा धोका, बोरिवलीत फुटलेल्या मलनि:स्सारण वाहिनीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
संबंधित ठिकाणी खणलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शनिवारी फुटलेल्या मलनि:स्सारण वाहिनीची अद्यापही दुरुस्ती झाली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई : महानगरपालिकेत मराठी भाषा पंधरवड्याला सुरुवात, यंदा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रमुख वक्ते म्हणून निवड
मराठी भाषेचा प्रसार अणि प्रचार व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी भित्तिपत्रके प्रकाशित केली जातात.
म्हाडाच्या खोणी, शिरढोण गृहप्रकल्पात लवकरच रुग्णालय, शाळा
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या खोणी आणि शिरढोण येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पात लवकरच रुग्णालय, शाळेसह खेळाच्या मैदनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
मुंबई : कार्यकारी सहाय्यक पदाच्या बहुचर्चित परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या १८४६ जागांसाठी घेण्यात आलेल्या बहुचर्चित परीक्षेचा निकाल मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. पालिकेच्या https:// portal. mcgm. gov. in संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे.
मुंबई : शिवाजी पार्क मैदानात अनधिकृत वाहनतळ, गाड्या न हटवल्यास खासगी कार उभ्या करण्याचा रहिवाशांचा इशारा
शिवाजी पार्क मैदानावर आता बेकायदा पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्यांचा विषय चर्चेत आला आहे. गेल्या रविवारी या मैदानावर मोठ्या संख्येने गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.
मुंबई : सोबत दारू प्यायला आला नाही म्हणून मित्रावर कोयत्याने हल्ला
ॲन्टॉपहिल परिसरातील ए. ए. इंटरप्रायझेस दुकानासमोर हा प्रकार घडला. तक्रारदार शेख ॲन्टॉप हिल येथील महाराष्ट्र नगर परिसरातील रहिवासी आहे.
गुजरातमधील व्यावसायिकाचे मुंबईतून अपहरण, तिघांना अटक
गुजरातमधील व्यावसायिकाचे मुंबईतून अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले असून व्यावसायिकाच्या मुलाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली.
शिवाजीपार्कवर मनसेचे आज पुस्तक प्रदर्शन; पैठणी कशी विणतात तेही पाहता येणार
महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेली पैठणी कशी विणतात हे पाहण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स