Latest News in Mumbai Today Live : मुंबईतून येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेले कंत्राट बंद येत्या ४ एप्रिलला संपणार असून त्यानंतर हे कंत्राट वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या मनातील क्लीनअप मार्शलची दहशत लवकरच संपणार आहे. राजकारण ते गुन्हे वृत्त, वाहतूक ते न्यायालयीन घडामोडी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अशा विविध बातम्यांची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येतील…

Live Updates

Mumbai Maharashtra News LIVE Today, 27 march 2025

17:34 (IST) 27 Mar 2025

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल रद्द, गारेगार प्रवासाऐवजी सामान्य लोकलमधून प्रवास करण्याची वेळ

पश्चिम रेल्वेने अचानक गुरुवारी वातानुकूलित लोकल रद्द केल्यामुळे प्रवासी बेहाल झाले. वातानुकूलित लोकलचे तिकीट असतानाही प्रवाशांवर सामान्य लोकलमधून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली. यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.

सविस्तर बातमी...

15:38 (IST) 27 Mar 2025

ओळख लपविण्यासाठी बांगलादेशी नागरिक बनले तृतीयपंथी

मुंबई: पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तृतीयपंथी बनवून वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना शिवाजी नगर पोलिसांनी गोवंडी परिसरातून अटक केली. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे बांगलादेशी संपूर्ण मुंबईत तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा....

11:11 (IST) 27 Mar 2025

विमानतळ परिसर उंची नियम उल्लंघन : नियमभंग करणाऱ्या इमारतींवर कारवाई करा, अन्यथा आम्ही आदेश देऊ – उच्च न्यायालय

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणारी बांधकामे अथवा इमारतींवर कायद्यानुसार कारवाई करा, अन्यथा आम्ही तसे आदेश देऊ, असे उच्च न्यायालयाने बुधवारी महानगरपालिका आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना बजावले.

सविस्तर बातमी...

11:10 (IST) 27 Mar 2025

कुलाबा येथील विनापरवाना फेरीवाल्यांना तुम्ही हटवणार की आम्ही आदेश देऊ ? उच्च न्यायालयाची फेरीवाला संघटनेला विचारणा

मुंबई : कुलाबा कॉजवे परिसरातील १७३ हून अधिक विनापरवाना फेरीवाल्यांना तुम्ही स्वत: हटवणार की आम्ही त्यांना हटवण्याचे आदे देऊ, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी कुलाबा कॉजवे टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियनला केली.

सविस्तर बातमी...

11:09 (IST) 27 Mar 2025

विमा कंपनीला तीन कोटींच्या खंडणीसाठी ई – मेल, बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी

मुंबईः प्रसिद्ध विमा कंपनीला तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ई-मेल पाठविण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली असून खंडणी न दिल्यास कंपनीची महत्त्वाची माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू आहे.

वाचा सविस्तर...

11:08 (IST) 27 Mar 2025

क्लीनअप मार्शलची सेवा ४ एप्रिल पासून बंद होणार; वाढत्या तक्रारीमुळे पालिकेचा निर्णय

मुंबईतून येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेले कंत्राट बंद येत्या ४ एप्रिलला संपणार असून त्यानंतर हे कंत्राट वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या मनातील क्लीनअप मार्शलची दहशत लवकरच संपणार आहे.

सविस्तर वाचा...

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स