Mumbai Breaking News LIVE Today, 28 February 2025 : महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो. राज्याचे प्रशासकीय मुख्यालय मंत्रायलय मुंबईत आहेच पण त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…

Live Updates

Mumbai News LIVE Updates : मुंबईतील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

13:14 (IST) 28 Feb 2025
12:54 (IST) 28 Feb 2025

Video: ‘मी पडलोच नसतो तुझ्या फंदात…’, पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’चा ट्रेलर प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.

सविस्तर वाचा...

12:22 (IST) 28 Feb 2025

Stock Market Crash : सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, भारतीय शेअर बाजारातील पडझडीमागे नेमकं काय कारण?

Stock Market Crash : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही (२८ फेब्रुवारी) शेअर बाजारात १००० अंकांनी घसरला आहे.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 28 Feb 2025

रेल्वे भूखंडाबाबत असलेल्या ‘अटी’मुळेच धारावी पुनर्वसनातील इमारतींना विलंब?

मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेच्या ४३ एकर भूखंडापैकी २३ एकर भूखंड ताब्यात आला असून त्यापैकी साडेसहा एकर भूखंडावर रेल्वे वसाहतींच्या चारपैकी तीन इमारतींचे काम सुरू करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 28 Feb 2025

मुंबई : भायखळ्यातील ५७ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई : भायखळा येथील बी. ए मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिल जवळच्या एका बहुमजली इमारतीला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली.

सविस्तर वाचा...

11:14 (IST) 28 Feb 2025

कायदे करून महिलांविरोधातील गुन्हे थांबणार नाहीत – चंद्रचूड

मुंबई : दिल्लीतील ‘निर्भया’ घटनेनंतर महिलांशी संबंधित कायद्यात अनेक बदल करण्यात आले. परंतु, केवळ कायदे करून अशा घटना रोखू शकत नाही. या घटना रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी, असे मत माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी व्यक्त केले.

सविस्तर वाचा....

10:46 (IST) 28 Feb 2025

SEBI New Chairman : तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; तीन वर्षांचा असणार कार्यकाळ

SEBI New Chairman Tuhin Kanta Pandey: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या (SEBI) अध्यक्षपदी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

सविस्तर वाचा...

09:31 (IST) 28 Feb 2025

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींचा अपहार : १५ कोटी रुपये स्वीकारणाऱ्या संशयीताला अटक

मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहारातील १५ कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलम (३३) याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी अटक केली. मनोहर याचे वडील उन्ननाथन अरूणाचलम ऊर्फ अरूण भाई यांना बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याने ४० कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा....

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader