Latest News in Mumbai Today : मुंबईसह उपनगरांत गुरुवारीही ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री इथे पत्रकार परिषद घेत भाजपावर सडकून टीका केली आहे. मुंबईतील अशा विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Mumbai Maharashtra News Today, 3 April 2025
‘मिठी’तील १० कंत्राटदारांची चौकशीघोटाळा प्रकरण; कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहितीची पालिकेकडे मागणी
मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. प्रकल्पाशी संबंधित १० कंत्राटदारांची चौकशी केली असून त्याशिवाय कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहिती महापालिकेकडे पोलिसांनी मागितली आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स