Mumbai Breaking News LIVE Today, 3 March 2025 : महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो. राज्याचे प्रशासकीय मुख्यालय मंत्रायलय मुंबईत आहेच पण त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…

Live Updates

Mumbai Maharashtra News LIVE Today

16:53 (IST) 3 Mar 2025

५० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची ४५०० कोटींची फसवणूक; ईडीकडून दिल्ली व मुंबईतील चार ठिकाणी छापे

मुंबई : पॅनकार्ड क्लब लि. गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नुकतीच मुंबई व दिल्लीतील चार ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणात ५० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची साडेचार हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संशयीत आरोपींच्या परदेशी मालमत्तांबाबची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा

16:43 (IST) 3 Mar 2025

रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे बंद; तातडीच्या वैद्यकीय सेवेपासून रेल्वे प्रवासी वंचित

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना चक्कर येणे, डोके दुखणे व इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघातांना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली होती.

सविस्तर वाचा

16:36 (IST) 3 Mar 2025

पूर्व द्रुतगती मार्गावर कचरावाहू वाहनाला ट्रकची धडक; चार तास वाहतूक कोंडी

मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड - विक्रोळीदरम्यान सोमवारी पहाटे कचरा घेऊन जाणाऱ्या महापालिकेच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटविल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.

सविस्तर वाचा

15:30 (IST) 3 Mar 2025

रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित चालक चाचणी केंद्र, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अनुशासित करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 3 Mar 2025

बीएस्सी नर्सिंग, विधि अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ; सीईटी कक्षाचा निर्णय

मुंबई : बीएस्सी नर्सिंग आणि विधि तीन आणि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला १० मार्चपर्यंत, तर विधि तीन वर्षे व पाच वर्ष अभ्यासक्रमांसाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:42 (IST) 3 Mar 2025

सीयूटीईच्या विषयांची संख्या झाली कमी; आता परीक्षेसाठी फक्त ३७ विषय

मुंबई : कॉमन विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूटीई - यूजी) २०२५ प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) सीयूटीई यूजीसाठी असलेल्या विषयांची संख्या ६३ वरून ३७ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये भाषा व विशिष्ट विषयांची संख्या कमी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 3 Mar 2025

कुसूम मनोहर लेलेप्रकरणाची पुनरावृत्ती, अवैध दत्तक प्रकरण उघड, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

पाटील प्रसूती करेल आणि रुक्साना बाळ दत्तक घेईल, असे दोघींनी परस्पर समजुतीने ठरवले. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनुसार, दत्तक द्यायच्या आधी मूल केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे सोपवावे लागते.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 3 Mar 2025

मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवे, ‘पार्ले पंचम’चे सर्व आमदारांना पत्र

सदनिका खरेदी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मराठी माणसांना मांसाहारी असल्यामुळे बहुतेक विकासक विविध कारणे सांगून घर विकण्यास तयार होत नाहीत.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 3 Mar 2025

मुंबई : मोबाइवरून ३० वर्षाच्या तरूणाची हत्या

मुंबईः मोबाइल घेऊन पळून गेल्याच्या रागातून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पिता-पुत्राला अटक केली.

सविस्तर वाचा

13:16 (IST) 3 Mar 2025
मुंबईतील किमान तापमानात घट होण्याची शक्यता

मुंबई : संपूर्ण फेब्रुवारी महिना तापमानाचा पारा चढाच राहिल्यामुळे मुंबईकरांना पहाटेचा गारवा देखील अनुभवता आला नाही. महिन्यातील काही दिवस सोडले तर किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:16 (IST) 3 Mar 2025
सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात, इतर पाच अधिकाऱ्यांचीही याचिका; उद्या सुनावणी

मुंबई : भांडवली बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.

सविस्तर वाचा

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader