Latest News in Mumbai Today Live : मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील वाहतूक, महानगरपालिका, गुन्हे… अशा विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today
वाहन क्रमांक पाटीमध्ये छेडछाड रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’ अनिवार्य
बई : बनावट वाहन क्रमांकांची पाटी बसवून, तसेच वाहन क्रमांकाच्या पाटीवर करण्यात येणारी छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य आहे.
म्हाडा भवनातील पैशांची उधळण प्रकरण : सर्व ११ अर्जदारांची गुरुवारी पुन्हा सुनावणी, २७ फेब्रुवारीच्या सुनावणीला ११ जणही होते गैरहजर
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आलेल्या पैशांच्या उधळण प्रकरणाची चौकशी विशेष समितीकडून सुरू आहे. या चौकशीअंतर्गत पात्रता निश्चितीसाठी समितीने २७ फेब्रुवारी रोजी ११ अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र यावेळी एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आता समितीने गुरुवारी, ६ मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीसांकडे
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याविरोधात दाखल गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
भांडवली बाजारातील कथित फसवणूक प्रकरण : माधबी पुरी बुच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती
मुंबई : भांडवली बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) माजी प्रमुख माधबी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अंतरिम स्थगिती दिली.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी अपहार प्रकरण :दोन आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करणार
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणातील दोन आरोपी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोअन व अपहारातील १५ कोटी रुपये स्वीकारणारा मनोहर उन्ननाथन याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखा आरोपींच्या कोठडीची मागणी करणार आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बँकेच्या संचालकांकडून बँकेच्या व्यवहारांबाबतची माहिती घेतली.
देखभाल खर्चाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे सत्र न्यायालयात, करूणा यांच्याशी विवाह झालाच नसल्याचा पुनरूच्चार
मुंबई : घरगुती हिंसाचाराच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून पहिल्या पत्नीला महिना देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या अंतरिम आदेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली पहिली पत्नी असल्याचा दावा करूणा यांच्याकडून केला जात असला तरी, आपला त्यांच्याशी कधीच विवाह झाला नव्हता या दाव्याचा धनंजय मुंडे यांनी अपिलात पुनरूच्चार केला आहे.
लेखक म्हणून पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीची स्वतःच्याच महाविद्यालयातून सुरुवात
मुंबई : कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांत मुंबईतील माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. विशेषतः रुईया नाट्यवलयने मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार व तंत्रज्ञ दिलेले आहेत. बहुप्रतीक्षित ‘सुशीला-सुजीत’ या मराठी चित्रपटाचे पटकथा व संवाद लेखन रुईया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अजय कांबळे याने केले आहे.
कोन, पनवेलमधील विजेते गिरणी कामगार उद्या आझाद मैदानवार धडकणार, देखभाल शुल्काच्या प्रश्नी मोर्चाचे आयोजन
मुंबई : सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने आता कामगारांना मुंबईबाहेर फेकले आहे. राज्य सरकारने गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कोन, पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांनी केला आहे. देखभाल शुल्कासह सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी आझाद मैदानावर धडकण्याचा निर्णय कोनगाव गिरणी कामगार समितीने घेतला आहे.
भरती ओहोटीच्या खेळात ‘कांदळवन सफर’
मुंबई : निसर्गातील अद्भूत ठेव्यांचा पर्यटनदृष्ट्या अधिक विकास होत असून आता गोराई खाडीतील कांदळवन उद्यान लवकरच पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लवकरच भरती-ओहोटीच्या खेळात कांदळवनाची सफर पर्यटकांना करता येणार आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स