Latest News in Mumbai Today: मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील वाहतूक, महानगरपालिका, गुन्हे… अशा विविध घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 05 March 2025
एमबीए प्रवेशाच्या सीईटीसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज, गतवर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये वाढ
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए व एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली.
सविस्तर वाचा....
मुंबई : नागरिकांना रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती क्यूआर कोडवरून मिळणार
मुंबई : आपल्या विभागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाची माहिती नागरिकांना क्यूआर कोडवरून मिळू शकणार आहे. शहर विभागात रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी माहिती फलक प्रदर्शित करण्यात आला आहे.
होळीत एसटी प्रवाशांचा प्रवास रखडणार, एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात निदर्शन आंदोलन
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज्यातील सर्व आगार, विभागाच्या मुख्यद्वारावर आंदोलन केले.
मुंबईतील किमान तापमानात घट
मुंबई : मुंबईत मागील एक – दोन दिवसांपासून काहीसा गारवा जाणवू लागला असून, बुधवारी तापमापकावरही पारा २० खाली घसरला. सांताक्रूझ येथे बुधवारी १९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा ३० अंशाहून अधिक असल्याने दिवसा मात्र उकाडा कायम आहे.
रुग्णालयांची एमजेपीजेवायची प्रलंबित देयके लवकरच होणार मंजूर, राज्य सरकारकडून १ हजार १६२ कोटी रुपये निधी उपलब्ध
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेंतर्गत रुग्णालयांची जवळपास १२०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. त्यासंदर्भातील तक्रारींची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने एक हजार १६२ कोटी रुपये निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीला मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालयांची प्रलंबित देयके मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रस्ते खोदकामास मनाई, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे वेगात सुरू असून रस्ते कामांसोबतच उपयोगिता वाहिन्यांची कामेही करण्यात येत आहेत. रस्ते विकास झाल्यानंतर खोदकाम, चर करायला तात्काळ प्रभागाने मनाई करावी, त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण संचालक अधिकाराच्या प्रतिक्षेत! वैद्यकीय शिक्षण संचलनालयाची वाट बिकटच…
मुंबई: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा अट्टाहास सरकारने पूर्ण केला असला तरी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची अवस्था मात्र बिकटच आहे. यातील गंभीर बाब म्हणजे तब्बल पाच वर्षांनंतर पूर्णवेळ वैद्यकीय शिक्षण संचालक नेमूनही त्यांना अधिकार मात्र कोणतेही दिलेले नाहीत.
चेंबूरमध्ये निर्माणाधीन इमारतीला भीषण आग
मुंबई : चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन कामगारांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर, ‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा, कोकणवासीयांची उत्सुकता शिगेला
मुंबई : कलात्मकतेला प्रयोगशीलतेची जोड देत वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर भक्ती आणि शौर्याचा संगम असलेले विविध चित्रपट २०२५ या वर्षात प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ऐतिहासिक तसेच भक्तीमय चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
फळ बाजारात आरोग्याशी खेळ; शिजवलेले अन्न उघड्यावर, तर बाजार आवारात घाणीचे साम्राज्य
नवी मुंबई</strong> : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात आता रमजान निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फळांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच हापूसचा हंगामाही सुरू होत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. मात्र बाजारात या कचऱ्याचे नियोजन होत नसून दोन-तीन दिवस कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
केईएम रुग्णालयात सहा वर्षांत १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू
मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये २०१९ पासून २०२४ पर्यंत १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नवजात अर्भकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मुंबई : रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागाव्यात, यासाठी अभय योजना जाहीर करणाऱ्या शासनाने वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केलेल्या २३ योजनांमध्ये विकासक नियुक्तीस मान्यता दिली आहे. या वित्तीय संस्थांची सहविकासक म्हणून नोंद होणार आहे. मुंबईतील सुमारे १४१ योजना विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. या झोपु योजनांपैकी अनेक योजनांना विविध वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केले होते.
रात्री गारवा, दिवसा उकाडा, मुंबईत किमान तापमान २० अंश सेल्सिअस खाली
मुंबई : मुंबईत एक दोन दिवसांपासून काहीसा गारवा जाणवू लागला असून, बुधवारी तापमापकावरही पारा २० खाली घसरला. सांताक्रूझ येथे बुधवारी १९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा ३० अंशाहून अधिक असल्याने दिवसा मात्र उकाडा कायम आहे
शिवडीत अघोषित पाणी कपात ? पाणीपुरवठ्याची वेळ कमी झाल्याचा आरोप
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवडी पूर्व आणि पश्चिम, तसेच काळाचौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. नियमित वेळेपेक्षा अंदाजे १० ते ३० मिनिटे कमी पाणीपुरवठा होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.
…आणि डॉक्टरां…आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिचा जीव वाचलाच्या प्रयत्नांमुळे तिचा जीव वाचला
मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाणे येथे एक माकडीण प्रसूती वेदनेदरम्यान बेशुद्ध पडली होती. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनविभगाशी संपर्क साधला. त्यानंतर माकडीणीला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला प्रसूती वेदना सुरू असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मात्र, ती नैसर्गिकरित्या पिलाला जन्म देऊ शकत नसल्याने तिच्यावर सिझेरियन प्रसूती करण्यात आली आणि डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळे माकडीणीचा जीव वाचला.
स्वच्छ इंधनासाठी अर्थसाह्य बेकरी व्यावसायिकांना कर्ज, अनुदान मिळवून देण्यासाठी पालिका समन्वयक
मुंबई : लाकूड आणि कोळसा इंधनावरील बेकरी व्यवसाय स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यासाठी या उद्याोगाला अर्थसाह्य मिळवून देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका प्रशासन करणार आहे. बेकरी उद्याोग स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यासाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे बेकरी मालकांनी सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने आता या उद्याोगांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज व अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मानखुर्दमध्ये ४१० खाटांचे नवे रुग्णालय, व्यवस्थापनासाठी पालिकेची निविदा; ११ कोटी रुपये खर्च
मुंबई : पूर्व उपनगरात महापालिकेचे आणखी एक नवीन रुग्णालय लवकरच उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएने बांधलेले ४१० खाटांचे हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असून मल्टी स्पेशालिटी लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय ३० वर्षे चालवण्यासाठी खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. त्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या असून त्याकरीता पालिका ११ कोटी खर्च करणार आहे.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे ऑक्टोबरपासून भुयारीकरण, पहिले स्वदेशी ‘टनेल बोअरिंग मशीन’ एप्रिलमध्ये ठाण्यात
मुंबई : ठाणे-बोरिवलीदरम्यानचे अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सध्या ठाण्याच्या दिशेने भुयारीकरणासाठी लॉन्चिंग शॉफ्टचे काम सुरू असतानाच आता हा प्रकल्प वेगाने मार्गी नेण्याच्या दृष्टीने ‘एमएमआरडीए’ने महत्त्वाचा टप्पा पार केला.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स