Latest News in Mumbai Today Live : मुंबई हे विविध संस्कृतींचे एक ठिकाण आहे, जिथे संपूर्ण भारत आणि जगभरातून लोक येतात, एक अनोखा आणि विविधतापूर्ण शहर आहे. तेव्हा राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…

Live Updates

Mumbai Maharashtra News LIVE Today, 10 March 2025

13:20 (IST) 10 Mar 2025

पाच वर्षांच्या तुलनेत बीएडचा प्रतिसाद वाढला, प्रवेश परीक्षेसाठी १ लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई : शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्ररीक्षेला नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

10:44 (IST) 10 Mar 2025

मुंबईत महिला व अल्पवयीन मुलींविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ, २०२४ मध्ये बलात्कार, विनयभंग व पोक्सो गुन्ह्यांत वाढ

मुंबई : शहरात महिलांविरुद्ध आणि मुलींविरुद्धच्या घडलेल्या गुन्ह्यांमध्ये २०२४ मध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबई बलात्कार, विनयभंग आणि बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे ४७८९ गुन्हे दाखल झाले आहे. २०२३ च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत मुंबईत दरदिवसाला १३ गुन्ह्यांची नोंद होत आहे.

सविस्तर वाचा....

10:42 (IST) 10 Mar 2025

गोरेगावमध्ये दुकानांना भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबई : गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिरानजीकच्या फिल्मसिटी मार्गावरील रत्नागिरी हॉटेलजवळील दुकानांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत आसपासच्या झोपड्या, गाळे, गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.

सविस्तर वाचा...

10:41 (IST) 10 Mar 2025

११०० कोटींची साखरपेरणी, सत्ताधाऱ्यांच्या आठ कारखान्यांना सरकारच्या हमीने कर्ज

मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सत्ताधाऱ्यांशी सबंधित आठ साखर कारखान्यांसह एकूण नऊ कारखान्यांना तब्बल ११०४ कोटींच्या कर्जाची खिरापत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

10:40 (IST) 10 Mar 2025

शेतकरी, ‘बहिणीं’चे लक्ष, राज्याचा आज अर्थसंकल्प

मुंबई : महायुतीला मिळालेल्या विक्रमी यशानंतर नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, याचीच उत्सुकता आहे. शेतकरी सन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करण्याचे आधीच जाहीर करण्यात आले असले तरी लाडक्या बहिणींचे अनुदान २१०० रुपये करण्याचा निर्णय घेतला जातो का, याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा...

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स (file photo )

Story img Loader