रविवारी मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचे नवनवे खुलासे समोर येत आहेत. आत्तापर्यंत २४ वर्षीय आरोपी मिहीर शाह यानं बीएमडब्ल्यू कारनं प्रदीप नाखवा व कावेरी नाखवा या वृद्ध दाम्पत्याला उडवलं आणि त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मिहीरनं त्या रात्री पबमध्ये पार्टी केल्याचंही उघड झालं आहे. त्यानंतर आता मिहीरच्या गाडीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून मिहीर शाह बीएमडब्ल्यू कारच्याही आधी एका पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये बसल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातलं सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी हा निष्कर्ष काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी पहाटे शिवसेना उपनेते राजेश शाह यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर शाह यानं बाईकवरून जाणाऱ्या नाखवा दाम्पत्याला आपल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. या धडकेमुळे कावेरी नाखवा हवेत उडाल्या आणि थेट बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर येऊन आदळल्या. प्रदीप नाखवा बाईकसह बाजूला पडले. पुढे दोन किलोमीटरपर्यंत मिहीरनं कार तशीच नेली. शेवटी कावेरी या खाली पडल्या आणि मिहीरनं कारसह पोबारा केला.

Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?

आधी मर्सिडीज आणि नंतर बीएमडब्ल्यू

मिहीर शाह त्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसण्याआधी एका मर्सिडीज कारमध्ये बसल्याचं सीसीटीव्ही फूटेज आता समोर आलं आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास मिहीरनं जुहूमधल्या एका बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास मिहीर पबमधून बाहेर पडला. त्याच्या काही मित्रांसोबत तो एका पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये बसला. मात्र, यावेळी तो कारच्या ड्रायव्हिंग सीटवर न बसता मागच्या सीटवर बसल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.

इथे पाहा CCTV फूटेज…

नंतर बदलली कार!

दरम्यान, पबमधून निघाल्यानंतर मिहीर त्याच्या घरी गेला आणि तिथे त्यानं आपल्या ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हवर जाऊ असं सांगून बीएमडब्ल्यू कार काढायला सांगितली. यानंतर तो वरळी परिसरात आला. तिथे त्यानं स्वत: कार चालवायला घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यानं नाखवा दाम्पत्याला धडक दिली आणि त्यात कावेरी नाखवा यांचं निधन झालं. अपघातानंतर मिहीरनं घटनास्थळावरून पोबारा केला. कावेरी नाखवा यांना धक्का दिल्यानंतर मिहीर वांद्रे-वरळी सीलिंकवरून पुढे गेला. कलानगरमध्ये त्यानं ड्रायव्हरला सोडलं आणि पुढे जाऊन कार सोडून दिली आणि तो पळून गेला.

Mumbai BMW Hit and Run Case: शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना अटक; अपघात प्रकरणी मुलाला मदत केल्याचा आरोप!

मिहीरच्या तपासासाठी पोलिसांची नोटीस

दरम्यान, या प्रकरणात पळून जाण्यासाठी मिहीरला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी राजेश शाह यांना अटक केली आहे. तसेच, मिहीरविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai news worli hit and run case mihir shah in mercedes car before bmw pmw
Show comments