मुंबई : प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह म्हाडा गृहप्रकल्प योजनेतील बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळाने सुरुवात केली आहे. तीन महिन्यांत प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर ३३ बांधकामांना काम थांबविण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या ३३ बांधकामे बंद असून या बंद बांधकामस्थळी प्रदूषण नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी झाल्यानंतरच त्यांना पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
मुंबईत दिवसेंदिवस वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असून हवेचा दर्जा खालावत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिका आवश्यक त्या उपापयोजना करीत आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांना, पायाभूत सुविधा प्रकल्पांना नोटीसा बजावण्यात येत आहेत.
हेही वाचा – तुटपुंजी भरपाई देण्याएवढा माणसाचा जीव स्वस्त नाही – उच्च न्यायालय
बांधकामासंदर्भात तक्रार
नोटीसा बजावलेल्यांपैकी ४० हून अधिक बांधकामांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले होते. बांधकामस्थळी आवश्यक त्या सुधारणा केल्यानंतर संबंधितांना बांधकाम पुन्हा सुरू करण्याची परवागनी देण्यात आली आहे. ३३ बांधकामे थांबविण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अंधेरी येथील एका पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत इमारतींच्या पाडकामादरम्यान धूळ पसरली जात असल्याची तक्रार आली होती.