मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांनी अधिक चोखपणे जबाबदारी पार पाडावी. पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, मद्या विक्री व तस्करी, सोने-चांदींची विक्री आणि तस्करी तसेच हवाला आदी संशयास्पद प्रकरणात कारवाई करण्यात कोणतीही हयगय करू नये, असे असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले.

संशयास्पद प्रकरणी थेट व तात्काळ जप्तीची कारवाई करावी. तसेच आर्थिक खर्चाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रीत करून तेथेही योग्य ती कारवाई करावी, मुंबई महानगरातील कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित विविध तपास व अंमलबजावणी यंत्रणांची महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक पार पडली. यावेळी गगराणी बोलत होते.

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

हेही वाचा…१०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आलेल्या काही अनुभवांच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोग मुंबईतील निवडणुकीशी संबंधित बारीकसारिक बाबींवर विशेष लक्ष ठेवून आहे. त्यामुळे, मुंबईत कार्यरत असलेल्या प्रत्येक यंत्रणांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांचे आपापसात योग्य समन्वय राहावे, यासाठी प्रत्येक यंत्रणेने समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, मद्य विक्री व तस्करी, सोने-चांदींची विक्री आणि तस्करी तसेच हवालांशी संबंधित घडामोडींवर अधिक बारकाईने आणि गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक यंत्रणेने अधिक सक्रिय होऊन अशा संशयास्पद प्रकरणांत कारवाई करण्यात कोणतीही कसूर ठेवू नये. प्रसंगी जप्तीची कारवाई करावी, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.

संबंधित यंत्रणांनी संयुक्त पथकांची निर्मिती करून त्यांची मुंबईतील ‘चेक पोस्ट’वर नियुक्ती करावी. योग्य कारवाईसाठी समन्वयक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील माहितीची नियमितपणे देवाणघेवाण करावी, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईच्या सीमेवर, बंदरांवर, समुद्र किनाऱ्यांवर, विमानतळ तसेच वाहतुकीच्या अन्य संसाधनाद्वारे केल्या जाणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून संशयास्पद प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करावी. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांबाबत दक्ष राहावे तसेच त्याठिकाणी काही गैरव्यवहार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

मुंबई महानगरातील विविध ठिकाणांहून जाणाऱ्या ‘नॉन शेड्यूल्ड फ्लाईट्ससंदर्भातील माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई पोलिस तसेच आयकर विभागाला नियमितपणे द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक खर्चाच्या बाबतीत काही मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहेत. त्याठिकाणी निवडणुकीच्या काळात पैशांचा व्यवहार होणार नाही तसेच अशा संवेदनशील मतदारसंघांमध्ये होणारी पैशांची देवाणघेवाण, व्यवहार किंवा अन्य कोणत्याही संशयास्पद वित्तीय बाबींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करावी, असे गगराणी यांनी सांगितले.

हेही वाचा…दागिन्यांच्या व्यवसायाच्या आडून ई सिगारेटची विक्री, ३० लाखांचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त

यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, विशेष पोलिस महानिरीक्षक आरती सिंह, सह पोलिस आयुक्त सत्या नारायण, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार उपस्थित होते. तसेच, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सक्तवसूली व अंमलबजावणी, महसूल गुप्तवार्ता, केंद्रीय वस्तू व सेवा कर, सीमा शुल्क, आचारसंहिता कक्ष आदी विविध यंत्रणांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.