मुंबई : पूर्व उपनगरात वास्तव्यास असलेल्या एका २७ वर्षीय महिलेवर त्याच परिसरातील एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचे सोमवारी उघडकीस आले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी सदर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पीडित महिला पूर्व उपनगरात पती आणि मुलासह राहते. पती सोमवारी सायंकाळी कामावर गेलेला असताना १७ वर्षीय आरोपी तिच्या घरात शिरला आणि त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.