बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या एकूण ४० नोटा हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Raj Thackeray Meets Fadnavis: राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, एक तास सुरु होती बैठक, चर्चांना उधाण

घाटकोपरमधील सर्वोदय सिग्नल परिसरातील सेंट्रल बँकेजवळ एक इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार घाटकोपर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने रविवारी रात्री परिसरात सापळा रचला. संबंधित वर्णन असलेला इसम पोलिसांच्या दृष्टीस पडला. पोलिसांनी तत्काळ झडप घालून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याजवळ ५०० रुपयांच्या एकूण ४० बनावट नोटा सापडल्या. सर्जेराव पाटील (५५) असे या आरोपीचे नाव असून त्याने या नोटा कुठून आणल्या याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai one arrested with fake currency notes mumbai print news amy