मुंबई : परळच्या ‘बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन’ येथे मेंदू मृत घोषित करण्यात आल्यानंतर १२ वर्षीय मुलीच्या पालकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. यावेळी या मुलीच्या दोन्ही किडनी, यकृत आणि हृदय दान करण्यात येऊन समाजासमोर एक आदर्श ठेवण्यात आला. यापैकी एक किडनी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमध्ये प्राप्तकर्त्याला बसविण्यात आली तर दुसरी केईएम हॉस्पिटलमध्ये गेली. तिचे यकृत ग्लेनईगल्स हॉस्पिटल, मुंबई तर हृदय चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

सप्टेंबर २०२० मध्ये सांताक्रूझ, मुंबई येथील रहिवासी असलेल्या वैदेही हिला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक परपुरा (आयटीपी) या गंभीर आजाराचे निदान झाले. या उपचाराचा एक भाग म्हणून तिला इम्युनोसप्रेसेंट्स आणि मॉड्युलेटर्सवर ठेवण्यात आले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये तिला इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन प्राप्त झाले. त्यानंतर १३ जून, २०२३ आणि १० जुलै, २०२४ रोजी तिला पॅक्ड रेड ब्लडसेल्स देण्यात आले. हळुहळु तिची तब्येत ढासळत गेली. १३ जुलै रोजी पहाटे वैदेहीला अचानक अशक्तपणामुळे एन्सेफॅलोपॅथी (मेंदूसंबंधीत बिघाड) आणि हेमेटेमेसिस (रक्ताच्या उलट्या) होऊ लागल्याने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये हर्नियेशनसह गंभीर इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव झाला आणि तिला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले. अवयवदानाबाबत तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर पालकांनी तिचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्याचा निर्णय घेतला.

Cops Bust sex racket in nandanvan
नागपूरच्या नंदनवनात देहव्यवसाय फोफावला!; अल्पवयीन मुलींकडून…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Mumbai, boy died while playing,
मुंबई : शाळेत खेळताना आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या
Pune, missing girl, Balewadi, Chaturshringi Police Station, quick response, found, handed over, search, vigilance, parents, police action, Police Quickly Locate Missing girl
कौतुकास्पद : अर्ध्या तासात चार वर्षांच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश
Anurag dead body, post-mortem, custody,
शवविच्छेदनानंतर अनुरागचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
kidnap, girl, kidnap attempt thane,
ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
rape, Vasai, School Rape Vasai, Yadvesh vikas shala rape,
Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

हेही वाचा…मध्य रेल्वे आज का विस्कळीत ? गोरखपूर एक्स्प्रेसमधून धुराचे लोट

आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने वाडिया हॉस्पिटलने त्यांचे कौतुक केले. निःस्वार्थतेची ही कृती करुणा आणि सहानुभूतीचे उत्तम उदाहरण आहे. या पालकांनी आपली मुलगी गमावली आहे असून आम्हाला याचे दु:ख आहे. आपल्या मुलीचे अवयव गरजुंना दान करण्याचा निर्णय या पालकांनी घेतल्याने आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. हे पालक खरोखरच सुपरहिरो आहेत. समाजात अवयव दानाचे महत्व पटवून देण्यासाठी त्याबाबात पुरेशी जनजागृती आवश्यक असल्याची प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिनी बोधनवाला यांनी व्यक्त केली.