मुंबई : एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून आतापर्यंत या बोटीवरील २१ जणांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेच एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या बोटीवर ३० ते ३५ प्रवासी होते. त्यांना वाचवण्यासाठी नौदल व मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एलिफंटा येथे जाणारी ‘नीलकमल’ नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याचे समजते. नौदल, जेएनपीटी व तटरक्षक दल व यलोगेट पोलीस ठाण्याच्या तील आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य चालू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मुंबई सागरी मंडळाचे अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.