मुंबई : ‘मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली’ (पीआरएस) सुविधा देखभालीसाठी १० ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ पासून मध्यरात्री २ पर्यंत आणि ११ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
हेही वाचा…मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरी
त्यामुळे प्रवाशांना यादरम्यान इंटरनेटवरून तिकीट आरक्षण करता येणार नाही. तिकीट आरक्षण, तिकिट रद्द करणे, चौकशी सेवा, चालू आरक्षण, तिकीट परतावा या सेवा उपलब्ध नसतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.