मुंबई : मुंबईत करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी दैनंदिन बाधितांची संख्या थेट १२०० च्या घरात पोहोचली. त्याच वेळी शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांतही लक्षणीय वाढ झाली आहे. जुलैपासून मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता़  मात्र, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. मुंबईत गुरुवारी १२०१ नवे रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  करोनाचे संकट पुन्हा वाढत असतानाच मुंबईत साथीच्या अन्य आजारांनीही डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू, डेंग्यू, हिवतापासह सर्वच आजारांचे रुग्ण वाढले आहेत. शहरात संपूर्ण जुलै महिन्यात हिवतापाचे ५६३ रुग्ण आढळले होते.  ऑगस्टच्या पंधरवडय़ात हिवतापाचे ४१२ रुग्ण आढळले. जुलैच्या ३१ दिवसांत डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले होते.  ऑगस्टमध्ये आतापर्यंत हा आकडा ७३ झाला. मुंबईत ऑगस्टमध्ये १४ दिवसांत स्वाइन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. 

यंदा सण मोठय़ा उत्साहात आणि एकत्र येऊन साजरे केले जात आहेत़  मात्र, मुंबईकरांनी मुखपट्टीचा वापर करावा आणि करोना नियम पाळावेत, असे आवाहन कृती गटाचे सदस्य डॉ़  राहुल पंडित यांनी केले.

पुढील तीन आठवडे महत्त्वाचे 

सणासुदीचा काळ आणि वातावरणातील बदलामुळे करोनासह अन्य आजार वाढत आहेत. पुढील दोन- तीन आठवडे रुग्णवाढ होऊन त्यानंतर रुग्णसंख्या कमी होईल, अशी शक्यता आहे.  त्यामुळे दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे सेव्हन हिल्स कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.  बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.