मुंबई : एकीकडे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव रेल्वे प्रवासी संघटनांना लोकल सुरळीत चालवण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात प्रवाशांचा लोकल प्रवास जीवघेणा होत आहे. गुरुवारी सकाळी काही सीएसएमटी लोकल परळ, कुर्ल्यापर्यंतच चालवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा – म्हाडाचा लोकशाही दिन आता ८ जुलै रोजी, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच लोकशाही दिन

हेही वाचा – मुंबईत एकदाची बरसात सुरु! काळ्याकुट्ट ढगांची गर्दी!

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याने जून महिन्याच्या सुरुवातीपासून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी येथील ३६ तासांच्या ब्लॉकच्या वेळी आणि ब्लॉकनंतर प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागत आहेत. तर, गुरुवारी सकाळी ९.५० ची ठाणे – सीएसएमटी लोकल सीएसएमटीऐवजी परळ आणि कुर्ल्यापर्यंतच चालवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. मध्य रेल्वेच्या गलथान कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सीएसएमटी येथे देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे काही लोकल परळपर्यंत धावत आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.