अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : अश्लील ध्वनिफिती, छायाचित्रे तयार करून त्यांच्या आधारे खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये (सेक्सटॉर्शन) वाढ झाली आहे. तुलनेने गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण फार कमी आहे. यावर्षी मुंबई पोलिसांना केवळ १० टक्के गुन्ह्यांची उकल करता आली आहे. हे आरोपी राजस्थानमधून फसवणूक करत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सेक्सटॉर्शन या सायबर फसवणुकीमुळे मानसिक तणावाखाली आलेल्या डोंबिवलीतील एका ३६ वर्षीय व्यक्तीने माटुंगा स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली.

 आरोपींनी या व्यक्तीला ‘व्हिडीओ कॉल’ करून त्याचे छायाचित्रण केले होते. नंतर त्यात बदल करून त्याला अश्लील स्वरूप देण्यात आले होते. या प्रकरणात ध्वनिचित्रफितीच्या बदल्यात दोन लाख रुपये या व्यक्तीने आोरोपींना दिले होते, असे मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. याप्रकरणी सेक्सटॉर्शनची मागणी करणाऱ्या तिघांविरोधात दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> दहिसर-भाईंदर जोडरस्त्यात ‘मिठा’चा खडा; मीठ उत्पादकांची नुकसानभरपाईची मागणी

मुंबईत गेल्या काही वर्षांत सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. मात्र, तुलनेने या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबईत २०२१ मध्ये सेक्सटॉर्शनचे ५४ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ३० गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी ५२ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊन ७८ गुन्हे दाखल झाले होते. पण, केवळ २५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून ३४ आरोपींना अटक झाली आहे. २०२२ मध्ये दाखल झालेल्या सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे २० गुन्ह्यांमध्ये १० लाखांहून अधिक रक्कम खंडणी म्हणून स्वीकारण्यात आली आहे. या वर्षी सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. जुलै महिन्यापर्यंत मुंबईत सेक्सटॉर्शनचे ३८ गुन्हे दाखल झाले असून केवळ ४ प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये दरवर्षी वाढ होत असताना अनेक प्रकरणांमधील आरोपी राजस्थानमधील असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या राज्यात सेक्सटॉर्शनच्या अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. त्यामुळे तेथील गावांमध्ये जाऊन आरोपींना अटक करणे कठीण आहे.

नेमके काय घडते? या प्रकारामध्ये आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण करून त्याद्वारे फसवणूक अथवा भीती दाखवून खंडणी मागितली जाते. अशाच प्रकाराला बळी पडल्यामुळे माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ३६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली.