खारघर येथील ओवे गावात भाडय़ाने राहणाऱ्या घुसखोर बांगला देशीयांना अटक करण्यासाठी सोमवारी पहाटे अडीच वाजता गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर बांगलादेशीयांनी हल्ला करुन त्यांना मारहाण केली. यात पोलीस उपनिरीक्षक सुभाष बांदेकर व पोलीस नाईक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहा बांगलादेशीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात बांगलादेशीय घुसखोर असून  मुंबई पोलिसांच्या आय युनिटवर परदेशातील घुसखोरांना अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या युनिटला खारघर येथील ओवे गावात मोठय़ा प्रमाणात बांगलादेशीय घुसखोर असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यामुळे उपनिरीक्षक बांदेकर  पथकासह ओवे गावी येऊन धडकले. त्यांनी या बांगलादेशीयांना जागे केले असता त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. पोलिस असल्याचे सांगूनही हे घुसखोरांना दगडफेक करण्याचे थांबविले नाही. या हल्यात बांदेकर व हांडे जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा