PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे गुरुवारी लोकार्पण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुल, एमएमआरडीए मैदान, मेट्रो मार्गिका ७, गुंदवली स्थानक ते मोगरापाडा मेट्रो स्थानक या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजित केला आहे. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे. ड्रोन आणि छोट्या विमानाने दहशतवादी हल्ला करू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय आकाशात ड्रोन, पॅरा ग्लायडर किंवा छोटी विमाने उडवण्यास बंदी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> PM Modi Mumbai Tour : मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट, म्हणाले…

दहशतवादी, समाजविरोधी घटक हे ड्रोन, पॅरा ग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्टचा (छोटे विमान) वापर करून हल्ला करू शकतात. त्यामुळे मानवी जीवन, आरोग्य सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी, मुंबई पोलिसांनी गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, मेघवाडी, जोगेश्वरी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोनसह आकाशात कोणतीही वस्तू उडवण्यास बंदी केली आहे. ही बंदी गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशान म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police ban on flying of drones small planes during pm narendra modi mumbai visit mumbai print news zws