मुंबई : चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर  अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेंबुर वाहतूक विभाग

बंद रस्ते :

१ ) हेमु कलानी मार्ग उमरशी बाप्पा जंक्शन ते बसंत पार्क जंक्शन,

२) गिडवानी मार्ग :- गोल्फ क्लब ते झामा चौक ते चेंबुर नाका पर्यंत.

पर्यायी मार्ग :

बसंत पार्क जंक्शन कडे जाण्याकरीता व्ही. एन. पुरव मार्गाच्या उत्तर वाहीनीने चेंबूर नाका उजवे वळण घेवून आर.सी. मार्गाने बसंत पार्क जंक्शन कडे मार्गस्थ होतील.

२) गिडवानी मार्ग :- गोल्फ क्लब सैनिक गार्डन डायमंड गार्डन व्ही. एन. पुरव मार्गाच्या दक्षिण वाहीनीने वाहने मार्गस्थ होतील.

हेही वाचा >>> गिरगावात मिरवणूक बघायला जाताय,या रस्त्यांवर प्रवास टाळा

वाहने उभी करण्यास बंदी :

१) हेमु कलानी मार्ग :- उमरशी बाप्पा जंक्शन ते बसंत पार्क जंक्शन (दोन्ही बाजुस).

२) व्ही एन पुरव मार्ग :- के. स्टार मॉल ते उमरशी बाप्पा जंक्शन (दोन्ही बाजुस)

३) आर. सी. मार्ग :- टेंभी ब्रीज ते झामामहल जंक्शन (दोन्ही बाजुस).

४) सी. जी. गिडवानी रोड गोल्फ क्लब ते झामामहल जंक्शन (दोन्ही बाजुस).

५) एम.जी. रोड :- हवेली ब्रीज ते अमर महल जंक्शन (दोन्ही बाजुस).

६) पी. एल. लोखंडे मार्ग चेंबुर फाटक रोड ते नारायण गुरू हायस्कुलकडील नाल्यापर्यंत (दोन्ही बाजुस).

चुनाभट्टी वाहतूक विभाग

वाहने उभी करण्यास बंदी :

०१) व्ही. एन. पुरख मार्ग. उमरशी बाप्पा चौक ते सुमननगर जंक्शन

०२) व्ही. एन. पुरव मार्ग. सुमननगर जंक्शन ते चुनाभ‌ट्टी फाटक

०३) एस.जी. बर्वे मार्ग. कुर्ला स्थानक पुर्व ते उमरशी बाप्पा जंक्शन

ट्रॉम्बे वाहतूक विभाग

बंद रस्ते –

१) घाटला गाव – सुभाषनगर रोड ते घाटला गाव गणेश विसर्जन तलावपर्यंत

पर्यायी मार्ग :- घाटला रोड ते वा. तु. पाटील मार्ग येथे जाण्याकरीता सुरेश पेडणेकर रोड, साई निधी सोसायटी

हेही वाचा >>> Ganesh Immersion 2024 Arrangements : दादर, वरळी भागांत कोणते रस्ते बंद, कोणते सुरू

मानखुर्द वाहतूक विभाग

वाहने उभी करण्यास बंदी :-

१) सायन पनवेल महामार्ग

२) घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड

मुलुंड वाहतूक विभाग

वाहतूकीस बंद रस्ते :-

१ ) दिनदयाळ उपाध्याय मार्ग (डंपींग रोड) उत्तर व दक्षिण वाहिनी, मुलुंड पश्चिम

पर्यायी मार्ग :- ला.ब.शा. मार्ग- देवीदयाळ मार्ग-पाच रस्ता-मुलूंड रेल्वे स्थानक-जटा शंकर डोसा मार्ग-एसीसी सिमेंट रोड-महाराणा प्रताप चौक

२) टँक रोड, उत्तर व दक्षिण वाहीनी, भांडुप पश्चिम

पर्यायी मार्ग –  ला.ब.शा. मार्ग-मंगतराम पेट्रोल पंप-क्वारी रोड-जंगल मंगल रोड-गाढव नाका-शिवाजी तलाव-खोत गल्ली

एक दिशा मार्ग :

१. जंगल मंगल रोड/टेंबीपाडा रोड जंक्शन (शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद).

२. लाल बहादुर शास्त्री मार्ग टेंक रोड जंक्शन (शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद).

३. सर्वेोदय नगर जंगल मंगल रोड, (शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद).

वाहने उभी करण्यास बंदी :

भट्टीपाडा मार्ग, भांडुप (प),  जंगल मंगल मार्ग, भांडुप. (प), दिनदयाळ उपाध्याय मार्ग (डंपींग रोड) मुलुंड (प),  लाल बहादुर शास्त्री मार्ग मुलुंड (प),  जंगल मंगल रोड/टेंबीपाडा रोड जंक्शन, लाल बहादुर शास्त्री मार्ग ते टॅक रोड जंक्शन (शिवाजी तलावा पर्यत.),  सर्वेादय नगर जंगल मंगल रोड.

साकीनाका वाहतूक विभाग

वाहने उभी करण्यास बंदी :-

ने.व्ही.एल.आर. रोड दक्षिण व उत्तर वाहीनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी जंक्शन ते दुर्गानगर दक्षिण व उत्तर वाहीनी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police changes traffic route in eastern suburbs for ganesh visarjan mumbai print news zws