मुंबई : टोरेस घोटाळाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुंबईतील वित्तीय व गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले. तसेच, काही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या त्यांनी सूचना केल्या.

हेही वाचा >>> मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात

आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबईतील कांदिवली, दादर, ग्रँट रोड, मीरा रोड, सानपाडा, कल्याण आदी ठिकाणी असलेल्या विविध शाखांतून सुमारे ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच, टोरेसकडून लकी ड्रॉमध्ये गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या १५ वाहनांची ओळखही पटली असून त्यांचाही तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. टोरेसच्या शाखा चालविण्यासाठी जागा भाड्याने दिलेल्या मालकाची चौकशी सुरू असून त्यात भाडेकरार, रकमेचा व्यवहार आदी विविध बाबींचा तपास केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत हजारो गुंतवणूकदारांनी दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >>> राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार

टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच लक्ष घातले असते, तर आता अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी झाली नसती, असे आरोप अनेकांकडून केले जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माजी संस्थापक, संचालक ओलेना स्टोएना आणि आर्टेम या युक्रेनी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींचा टोरेस घोटाळ्यामागे हात असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

Story img Loader