अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) तस्करीचा गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर कोर्टात हजर केलं जात असताना ललित पाटीलने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यात त्याने “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं. यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावं सांगणार आहे,” असं वक्तव्य केलं. याबाबत विचारलं असता मुंबई पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ललित पाटीलला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलीस म्हणाले, “याबद्दल भारतीय दंड विधान कलम २२४ नुसार ललित पाटीलवर एक स्वतंत्र गुन्हा पुण्यात दाखल आहे. पुणे पोलीस त्यांच्या तपासात या दृष्टीने काम करत असतील.”

“आम्ही अमली पदार्थांचं मोठं रॅकेट उध्वस्त केलं “

या प्रकरणात अनेक सत्ताधारी नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही होत आहे. याबाबत विचारलं असता पोलीस म्हणाले, “आमचं प्रकरण अमली पदार्थांबाबत आहे. आम्ही अमली पदार्थांचं मोठं रॅकेट उध्वस्त केलं आहे. आम्ही अमली पदार्थांची फॅक्टरी चालवणाऱ्यांबाबत तपास करत आहोत.”

हेही वाचा : अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला तामिळनाडू येथून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

“सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच ललित पाटीलला अटक”

“ड्रग्जचं उत्पादन आणि त्यांचा पुरवठा यात दोघांचाच सहभाग होता. तो सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही पाठपुरावा करून अटक केली. आतापर्यंत याप्रकरणी आम्ही १४ जणांना अटक केली आहे. सकाळी ललित पाटीलला अटक केली आहे,” अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police comment on lalit patil claim about drugs case after arrest pbs