मुंबई : संपूर्ण देशासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या अमली पदार्थाविरोधात मुंबई पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत पाच हजार कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. केवळ मुंबईतच नाही, तर अगदी राज्यभरात कारवाई करून अमलीपदार्थाचे सहा कारखाने उद्धवस्त केले आहेत. मुंबई पोलिसांची ही मोहिम नेमकी कशी सुरू आहे, याबाबतची माहिती ‘लोकसत्ता’च्या ‘शहरभान’ कार्यक्रमातून मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून जाणून घेण्याची संधी सर्वांना उपलब्ध होणार आहे.

तरुण पिढीला अमलीपदार्थाच्या विळख्यापासून रोखण्यासाठी नागरिक म्हणून आपण पोलिसांना कशी मदत करून शकतो, याची माहिती या कार्यक्रमातून मिळणार  आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचा >>> महिलांना रोजगार देणाऱ्यांना सवलती; अष्टसूत्री धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता  

मुंबई पोलिसांनी अंमलीपदार्थ तस्कराविरोधात शहरात सर्वत्र शोध मोहिम राबवण्यात आली होती. महापालिकेच्या मदतीने पान टपरी, अवैध हुक्का पार्लर व तसेच महाविद्यालय परिसरातील पान टपऱ्या हटवण्यात आल्या. ई- सिगारेट विरोधातही पोलिसांनी विशेष मोहिम राबवली. गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांनी चार हजार ८०० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट केले. या मोहिमेला एक लोकचळवळीचे स्वरूप देण्यात आले. अशा विविध उपक्रमांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी. तसेच पोलीस व नागरिकांमधील संबंध अधिक दृढ होऊन, पोलिसांच्या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य मिळावे, या विचारातून ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

यापूर्वी या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, मेट्रो व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरकणाचे आयुक्त संजय मुखर्जी आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला आहे.

* या उपक्रमांच्या  पुढील भागात अमली पदार्थाविरोधात पोलिसांनी कोणत्या कारवाया केल्या, नागरिक म्हणून त्यात आपण कसे मदत करू शकतो, याबाबत सर्वंकष माहिती देण्याचा ‘लोकसत्ता’चा मानस आहे. त्यासाठी बुधवार, २७ डिसेंबर  रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, विलेपार्ले येथे  शहरभान’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधणार आहेत.