मुंबई: अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता दादर रेल्वे स्थानाकावर कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंड येणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या शुक्रवारी मध्यरात्री एक अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड दादर रेल्वे स्थानकात सकाळी १० वाजता येणार असून त्याने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असेल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. तसेच मुंबईत तो घातपात करणार असल्याचेही त्याने सांगितले. हे बोलून त्याने तात्काळ दूरध्वनी बंद केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला दूरध्वनी केला असता त्याने मोबाइल उचलला नाही.

हेही वाचा : कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाकडून पोलीस तक्रार दाखल

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
accused absconded from Ajani police station
नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार
Loksatta anvyarth Transfer of the Director General of Police as per the order of the Election Commission before the assembly elections
अन्वयार्थ: उच्च परंपरेला काळिमा

काही काळानंतर त्याने मोबाइल बंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दादर रेल्वे पोलीस, दादर पोलीस, शिवाजी पार्क पोलीस, भोईवाडा पोलीस यांना दूरध्वनीबाबतची माहिती देऊन सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली. पण तपासणीत तसे काहीही आढळले नाही. यापूर्वी सलमानच्या घराजवळ लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने टॅक्सीची नोंदणी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील २० वर्षीय तरूणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. रोहित त्यागी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील रहिवासी आहे. त्याने गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथून वांद्रे येथे जाण्यासाठी खासगी टॅक्सीची नोंदणी केली होती. याप्रकरणी आरोपी तरूणाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केवळ मस्करी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे त्याचे चौकशीत सांगितले होते.