अटक टाळण्यासाठी ‘कृष्णकुंज’वरून नाटय़मयरीत्या पलायन; पोलिसांची फजिती

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर शुक्रवारी एक नाटय़मय प्रसंग घडला. जय्यत तयारी करून शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे अधिकारी लवाजम्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेचे पालिकेतील गटनेते व नगरसेवक संदीप देशपांडे व संतोष धुरी यांना पकडण्यासाठी पोहोचले, परंतु त्यांच्या हातावर तुरी देऊन देशपांडे व धुरी पसार झाले आणि पोलिसांना हात हलवत परतावे लागले.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

‘मी खड्डय़ांना जबाबदार आहे,’ अशी पाटी संदीप देशपांडे व संतोष धुरी यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांच्या हाती धरायला लावल्यानंतर पालिकेतील ४२०० अभियंत्यांनी पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला. आयुक्तांनी हा राजीनामा फेटाळला असला तरी या घटनेने सरकार हादरले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अभियंत्यांची नाराजी परवडणार नाही हे लक्षात घेऊन मंत्रालयातून सूत्रे फिरली. देशपांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल तर झालाच शिवाय त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले. वरूनच आदेश आल्यामुळे पोलिसांनी देशपांडे यांना शोधायला सुरुवात केली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देशपांडे व धुरी असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांसह पोलिसांचा ताफाच गाडी घेऊन अटक करण्यासाठी पोहोचला. सावधगिरी म्हणून ‘कृष्णकुंज’बाहेरील रस्त्याच्या टोकाला पोलिसांची मोठी व्हॅनही सज्ज ठेवण्यात आली होती. पोलीस अटक करण्यासाठी आल्याची माहिती मनसेच्या गुप्तचरांना मिळाली होती. तथापि अटक करून जामीन न घेण्याची भूमिका देशपांडे यांनी आधीच जाहीर केलेली असल्यामुळे पोलीस थोडेसे बेसावध होते.

मनसेचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने जमले होते. संदीप देशपांडे व संतोष धुरी ‘कृष्णकुंज’मधून बाहेर पडल्यानंतर एका पोलीस निरीक्षकाने देशपांडे यांना बोलावून घेतले. तेव्हा समोरच उभ्या असलेल्या चॅनलच्या प्रतिनिधीला बाइट देऊन येतो असे देशपांडे यांनी सांगितले. त्यानुसार दोघा नगरसेवकांनी बाइट दिला आणि देशपांडे यांनी सहजच फोनवर बोलत रस्त्यावरून चालायला सुरुवात केली. आधीच ठरल्याप्रमाणे ‘कृष्णकुंज’पासून पंधरा फुटांवर एक गाडी सज्ज होती. पोलिसांच्या काही लक्षात येण्यापूर्वीच देशपांडे व धुरी गाडीत बसले आणि पसार झाले. त्याबरोबर पोलिसांची एकच धावपळ उडाली.. धावत पळत पोलीस आपल्या जीपमध्ये बसले आणि पाठलागाला सुरुवात झाली. थोडय़ाच अंतरावर नगरसेवकांची गाडी पकडू, असा पोलिसांना विश्वास होता. ‘कृष्णकुंज’बाहेरील रस्ता एकीकडे शिवाजी पार्ककडे वळतो तर दुसरी बाजू सेनापती बापटांच्या पुतळ्याच्या दिशेने जाते.

मनसेच्या नगरसेवकांना घेऊन जाणारी गाडी सेनापती बापटांच्या पुतळ्याच्या अलीकडे एका क्षणासाठी थांबली आणि त्यातून हे दोन्ही नगरसेवक खाली उतरून रस्त्याने चालू लागले. पाठोपाठ येणाऱ्या पोलिसांच्या गाडीचे त्यांच्याकडे लक्षच गेले नाही. ते समोरून जाणाऱ्या मनसेच्या गाडीचा पाठलाग करीत राहिले. शेवटी पोलिसांच्या गाडीने मनसेची गाडी अडवली तेव्हा लक्षात आले पक्षी पिंजऱ्यातून कधीच उडाले आहेत.. पण गेले कुठे.. व कसे..याचा त्यांना पत्ताच लागला नाही. रस्त्यावर उभे राहून हा पाठलाग व फसगत पाहात हे दोन्ही नगरसेवक हसत हसत निघूनही गेले होते. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिसांना समजताच सारेच हादरले. एकापाठोपाठ वरिष्ठ पोलिसांच्या गाडय़ा ‘कृष्णकुंज’च्या कोपऱ्यावरील रस्त्यावर येऊन पोहोचल्या..पोलीस उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक हे झाले कसे आणि आता ‘वरती’ काय सांगायचे या चिंतेत उभे होते..तर ‘कृष्णकुंज’बाहेर असलेले मनसेचे कार्यकर्ते पोलिसांची गंमत पाहात हसत होते.

Story img Loader