अनिश पाटील

मुंबई पोलिसांनी महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी सायबर दहशतवादाच्या कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाऊद टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईवर ‘२६-११’ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे झाली. मात्र तो भयानक हल्ला आजही कोणी विसरू शकलेले नाही. दहशतवादामध्ये गेल्या काही वर्षांत नार्को टेररिझम, सायबर टेररिझम यांसारख्या संकल्पना आल्या आहेत. या बाबींची माहिती घ्यायची असेल तर दहशतवाद या संकल्पनेच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी म्हणजे १७९० मध्ये दहशतवाद ही संकल्पना भाषा व्यवहारात आली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर मॅक्समिलियन रॉबेस्पिअरने आपल्या विरोधकांचे हत्यासत्र सुरू केले. अनेकांना गिलोटिनवर चढविले. तेही जन सुरक्षेच्या नावाखाली. जन सुरक्षा समितीच्या (पब्लिक सेफ्टी कमिटी) माध्यमातून. ‘रेन ऑफ टेरर’ म्हणून तो कालखंड ओळखला जातो. तो राज्य यंत्रणेने लोकांविरोधात चालविलेला दहशतवाद होता. आता मात्र त्याची व्याख्या बदलली आहे. आता राज्य यंत्रणेच्या दहशतवादाला राष्ट्रवादाची झालर लावलेली असते. आता राज्य यंत्रणेविरोधातील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे करण्यात आलेल्या हिंसाचाराला दहशतवाद म्हटले जाते. राज्य यंत्रणेच्या धोरणांवर परिणाम करणे किंवा सरकार उलथवून लावणे हा या दहशतवादाचा हेतू असतो.

हेही वाचा >>> मुंबई : कुस्ती प्रशिक्षकाला अटकेपासून अंतरिम संरक्षण, दहा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

कोणत्याही देशाचे सरकार तेथील नागरिकांनी दिलेल्या मान्यतेवर उभे असते. तिच्या अभावी सरकार काम करूच शकत नाही. या मान्यतेला तडा देऊन भय निर्माण करणे हे दहशतवादाचे प्रथम उद्दिष्ट असते. हिंसाचार हे त्याचे हत्यार असते. केवळ त्या हिंसेने थेट बाधीत होणारेच नव्हे, तर राष्ट्रातील अन्य नागरिकांच्या मनातही भय निर्माण करणे, त्यात आता समाज माध्यमांचाही वापर केला जाऊ शकतो. तेवढेच नाही, तर सरकार आपले संरक्षण करण्यात असमर्थ आहे, असे वाटायला लावणे असा आभास निर्माण करणेही या दहशतवाद्यांना अपेक्षित असते. त्यातून सायबर दहशतवादासारख्या संकल्पना अस्तित्त्वात आल्या आहेत.

 दहशतवादामुळे किती जणांचा मृत्यू झाला यापेक्षा आपण किती भीती निर्माण करू शकतो हा मूळ उद्देश असतो. १९९३ मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असतील, मुंबईवरील ‘२६-११’चा दहशतवादी हल्ला असेल, या घटनांमध्ये किती लोकांचा बळी गेला हे अनेकांना पटकन आठवणार नाही. परंतु त्या घटनांच्या जखमा आजही ताज्या आहेत. ते क्रूर कृत्य अनुभवलेला कोणीही ते विसरू शकणार नाही. हल्ल्यातील नाटय़मयता आणि मानसिक परिणामकारकता दहशतवाद्यांसाठी महत्त्वाची असते. देशातील महत्त्वाची ठिकाणे वा लष्करीदृष्टय़ा महत्त्वाची स्थळे, परदेशी नागरिकांचा वावर असणारी ठिकाणे जाणीवपूर्वक लक्ष्य केली जातात.

सरकारच्या हतबलतेमुळे आपल्या देशाची मान खाली गेली, लष्कर वा पोलीस स्वत:चेही संरक्षण करू शकत नाहीत, अशा भयभावनांतून नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे मूळ उद्दीष्टय़ असते. त्यांची रणनीती स्पष्ट असते. त्यांचे मुख्य लक्ष्य म्हणजे नागरिकांमधील भीती व त्याचा दीर्घकालिन परिणाम. ते साध्य करण्यात यश आले म्हणजे दहशतवाद्यांचा हेतू तडीस जातो. इस्रायलवर हमासने केलेला हल्ला व त्यानंतर जगभरात निर्माण झालेली भयावह स्थिती त्याचे ताजे उदाहरण आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी सनसनाटी वृत्त देणाऱ्या वृत्तवाहिन्यांन्या, विरोधी पक्षांनी, काही ‘स्वयंसेवी’ संस्थांनी या हेतूला अप्रत्यक्षरित्या खतपाणी घातले. काळानुसार दहशवाद्यांच्या हाती समाज माध्यमांच्या रूपाने महत्त्वाचे शस्त्र लागले. जास्त नाही एक १० ते ११ वर्षांपूर्वीचेच उदाहरण आहे. जुलै, २०१२ मध्ये आसाममध्ये बोडो आदिवासी आणि मुस्लीम स्थलांतरित यांच्यात संघर्ष पेटला होता. त्यानंतर दहा-बारा दिवसांतच त्याचा वणवा दक्षिणेकडील राज्यांतही पसरला. त्यावरून ११ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठा दंगा झाला. त्यानंतर भारतीय इतिहासातील फाळणीनंतरच्या सर्वात मोठय़ा स्थलांतरास सुरुवात झाली. त्या काळात इंडियन मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांसाठी ज्ञात असलेल्या भागांतच प्रामुख्याने ईशान्य भारतीयांना लक्ष्य करण्यात आले होते. हा योगायोग नव्हता. पाकिस्तानात उगम असलेल्या संकेतस्थळांवरून, समाज माध्यमस्थळांवरून, मोबाइल संदेशांतून ईशान्य भारतीयांविरोधात तेव्हा गरळ ओकली जात होती. त्यांच्या मनात भय निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करण्यात येत होता. हे सरकारच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते समजण्यासाठी मुंबईत दंगा व्हावा लागला. त्यानंतर तशी सुमारे अडिचशे संकेतस्थळे बंद करण्यात आली. एका दिवशी पाचहून अधिक एसएमएस पाठविण्यावर पंधरा दिवसांसाठी बंदी घालण्यात आली. तो एक प्रकारे सायबर दहशतवादाच होता. त्याची धग सर्वप्रथम आपण जाणवली होती. त्यानंतर समाज माध्यमांचा वापर करून वारंवार देशातील वातारवण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याची ताकद सायबर दहशतवादात आहे. दहशतवादी, शत्रू राष्ट्रांकडून दहशतवादासाठी समाज माध्यमांचा सर्रास वापर होणार आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपण तयार आहोत का, हा मोठा प्रश्न आहे.