मुंबई : मुंबई पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात खांदेपालट करण्यात आले असून ६५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ४३ सहायक पोलीस आयुक्तांना नवीन ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना सहायक पोलीस आयुक्तपदी बढती मिळालेल्या १८ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
सहायक पोलीस आयुक्त राजू कसबे यांची वाहतूक विभाग, विजय बेलगे यांची मुख्यालय – २, प्रदीप खुडे यांची मुख्यालय – १, सुहास कांबळे यांची खेरवाडी विभाग, संजय डहाके यांची देवनार विभाग, सुनील कांबळे यांची संरक्षण व सुरक्षा विभागात नेमणूक करण्यात आली. सुनील चंद्रमोरे यांची गुन्हे शाखा, सिराज इनामदार, सोमेश्वर कामठे आणि दीपक पालव यांची विशेष शाखा – १, श्रिवद्र दळवी यांची मुलुंड विभाग, शशिकांत भंडारे यांची नेहरू नगर विभाग, शेखर डोंबे यांची वाहतूक विभाग, मनोज शिंदे यांची सशस्त्र पोलीस दल- वरळी, महेश मुगुटराव यांची सांताक्रुझ विभाग, भूषण बेळणेकर यांची वांद्रे विभाग, कुमुद कदम यांची सशस्त्र पोलीस दल नायगाव आणि झुबेदा शेख यांची संरक्षण व सुरक्षा विभागात नेमणूक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्तपदी बढती मिळून मुंबईत नियुक्ती मिळालेल्या १० अधिकाऱ्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात माया मोरे यांची यलोगेट विभाग, शशिकरन काशीद यांची कुलाबा विभाग, शशिकांत भोसले यांची अंधेरी विभाग, संदीप भागडीकर यांच्याकडे दादर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या चार सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात खेरवाडी विभागाचे सहायक आयुक्त कैलासचंद्र आव्हाड यांची डोंगरी विभागात बदली करण्यात आली आहे, तर विनंतीनुसार पोलीस कल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर गायके यांची दहिसर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक आयुक्त मृत्युंजय हिरेमठ यांची आझाद मैदान विभागात नियुक्ती करण्यात आली.