Mumbai Police : मुंबई पोलिसांची ओळख ही जगात उत्तम पोलीस अशी आहे. अनेक गुन्ह्यांची उकल शिताफीने करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे. अगदी खुनाचं प्रकरण असेल तरीही आरोपीचा छडा लावण्यात मुंबई पोलीस निष्णात समजले जातात. मात्र सध्याच्या घडीला एक घटना अशी घडली आहे ज्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम चार पोलिसांनी केलं आहे. या चारजणांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदार ( Mumbai Police ) यांचा समावेश आहे. या चौघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओत एका माणसाच्या खिशात ड्रग्ज ठेवताना हे चौघे दिसत आहेत. डमी आरोपी बनवण्यासाठी हे कृत्य करताना पोलीस ( Mumbai Police ) दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या चौघांना निलंबित करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.

काय दिसतं आहे फुटेजमध्ये ?

सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणात हे दिसून येतं आहे की दोन पोलीस उभे आहेत आणि इतर दोघं गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीची झडती घेत आहेत. त्यानंतर हेदेखील दिसतं आहे की झडती घेता घेता त्या व्यक्तीच्या पँटच्या खिशात एक पोलीस ( Mumbai Police ) ड्रग्ज ठेवतो. ड्रग्ज प्रकरणात बोगस आरोपी बनवण्यासाठी हे करण्यात आल्याचं समजतं आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांवर ( Mumbai Police ) विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. मुंबईतल्या खार या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या या चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
devendra fadanvis meeting
सर्व गुन्हेगारांना कठोर शासन : मुख्यमंत्री
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा
15 year old accused stealed Rs 32 000 and mobile from 80 year old man
पुणे : ज्येष्ठ नागरिकाचे हात पाय बांधत चोरी करणाऱ्या अल्पवयीन केअर टेकरला १२ तासात अटक
cbi itself files case against own officer in corruption charges
भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा;सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त
accused Sachin Makwana arrested in connection with theft of diamonds
दीड कोटींच्या हिरे चोरीप्रकरणी आरोपीला अटक, ९७ टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात यश

नेमकी ही घटना काय आहे?

मुंबईतल्या खार या भागात ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली. गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियल या व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या खिशात २० ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात आलं. त्यामध्ये डॅनियलच्या खिशात पोलीसच काही तरी ठेवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- मुंबई : तोतया अधिकाऱ्याकडून तरुणाची फसवणूक

त्यानंतर पोलिसांनी ( Mumbai Police ) तातडीने डॅनियलला सोडले. तसेच त्याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते असे सांगणयात आले. मात्र सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चारही अधिकारी आणि अंमलदारांना निलंबित केलं आहे.

Story img Loader