भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि ३० पेक्षा जास्त पक्ष कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्यभरातील मंदिरं उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवरच सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार व भाजपा कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर मोठ्यासंख्येने जमले होते, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.

गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “ते बाबुलनाथ मंदिराबाहेर निदर्शने करत असताना आम्हाला माहिती मिळाली, की ३५ पेक्षा जास्त लोक जमले आहेत आणि मंदिरे पुन्हा उघडण्याची मागणी करत आहेत. म्हणून आम्ही घटनास्थळी गेलो आणि त्यांना तेथून निघण्याची विनंती केली. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मुनगंटीवार यांच्यासह भाजपा पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणाहून निघून गेले, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, आम्ही लवकरच गुन्हा दाखल केलेल्या लोकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करू.”

करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने सोमवारी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले होते. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, ते आंदोलनात सहभागी झाले नव्हते.

भाजपाचा राज्यभरात शंखनाद!

राज्य सरकारला केवळ नोटांचा व मद्य दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी शंखनाद करण्यात आल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. करोना निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. मात्र मंदिरे सुरू झाली नाहीत. त्यामुळे भाजपला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागल्याचे सांगत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते.