मुंबईतल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीने एका अभिनेत्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार पोलिसात दिली आहे. तसंच त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असंही या महिलेने म्हटलं आहे. या अभिनेत्याचं नाव साहिल खान असं आहे. साहिल खानच्या विरोधात FIR करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसंच साहिल खानने पीडित महिलेचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिच्याविषयी अश्लील पोस्ट लिहिली असाही आरोप आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे हे प्रकरण?

मुंबई पोलिसांकडे एका ४३ वर्षीय महिलेने तिला अभिनेता साहिल खानकडून धमकी मिळत असल्याची आणि तिच्या विषयी अपमानजनक पोस्ट केल्याची तक्रार केली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये जिमच्या पैशांवरून साहिल खान आणि पीडित महिलेचं भांडण झालं. साहिल खानने त्यानंतर माझा लैंगिक छळ केला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. असंही या पीडित महिलेने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी या प्रकरणात साहिल खानच्या विरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात आम्ही कलम ५००, ५०१, ५०९, ५०४ आणि कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपी साहिल खान आणि पीडित महिला यांचे प्रेम संबंध होते. त्यानंतर साहिल खानच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. साहिल खान या अभिनेत्याने स्टाईल, एक्सक्युज मी, अलादिन, रामा द सेव्हियर अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police have registered an fir against bollywood actor sahil khan for threatening woman at gym scj