मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा मंगळवारी दादर पोलिसांनी जबाब नोंदवला. तीन तासांच्या चौकशीनंतर त्या दादर पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात हा जबाब नोंदवण्यात आला. यापूर्वीही २८ ऑक्टोबरला पेडणेकर यांना दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

 झोपु प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून नऊ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५१ वर्षीय तक्रारदाराला दादरमध्ये सदनिका खरेदी करायची होती. डिसेंबर २०१४ मध्ये तक्रारदाराला एका आरोपीने प्रभादेवी येथील एका झोपु प्रकल्पात ३२ लाखांत सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आरोपीने जून २०१५ मध्ये घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार यांच्यासह त्यांच्या परिचयातील व्यक्ती अशा नऊ जणांनी सुरुवातीला १५ लाख रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी ३५ लाख रुपये अटक आरोपीला दिले होते. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराला सदनिका दिल्या नाही. तक्रारदार यांनी वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी ३४ लाख ५० हजार रुपये तक्रारदार व त्यांच्या परिचित व्यक्तींना परत केले. याप्रकरणी उर्वरित रक्कम न मिळाल्यामुळे अखेर तक्रारदार यांनी जून २०२२ मध्ये दादर पोलिसांकडे तक्रार केली होती.

हेही वाचा >>> “…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल” घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

जबाबाची पडताळणी

याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली. त्यातील अटक आरोपीने चौकशीत पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आरोपीच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पेडणेकर यांना चौकशीसाठी २८ ऑक्टोबरला बोलावण्यात आले होते. पेडणेकर या वीस मिनिटे पोलीस ठाण्यात होत्या. त्यानंतर मंगळवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात होते. त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारास त्या दादर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास त्या दादर पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या. यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पेडणेकर यांच्या जबाबाची पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

कॅगची चौकशी सुरू झाली की सगळी नाती आठवतील!’ ; शिंदे गटाकडून पेडणेकर यांना इशारा

मुंबई : आता फक्त एसआरए प्रकरणाची चौकशी सुरू झाली, तर तुम्हाला मूळ शिवसैनिक आठवले; पण कॅगची चौकशी सुरू झाली की सगळी नाती आठवतील, असा खुलेआम इशारा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिला आहे. एसआरए प्रकरणातील चौकशीप्रकरणी पेडणेकर या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मात्र कॅगची चौकशी सुरू झाली की कोणाची भेट घ्यायची त्याची यादीच काढून ठेवा, असेही आव्हान त्यानी दिले आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरएशी संबंधित एका प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. यावरून शिंदे गटाने पेडणेकर यांना लक्ष्य केले आहे. आधी गद्दार, खोके अशा शब्दांत पेडणेकर यांनी ज्यांचा उल्लेख केला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ शिवसैनिक असल्याची आठवण आता पेडणेकर यांना झाल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केले होते, त्यावरून म्हात्रे यांनी टीका केली आहे.

पेडणेकर या शिवसेनेची बाजू मांडणारी तोफ आहेत, त्यामुळे त्यांच्यामागे अशी चौकशी लावली असेल तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर त्यात काहीही गैर नाही.

अ‍ॅड. अनिल परब</strong>, शिवसेना नेते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police interrogated former mayor kishori pednekar for three hours over sra scam zws