मुंबईः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत १०९५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच ५३६ धार्मिक व संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय २०५ ठिकाणी कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी शहरात नाकाबंदीदरम्यान ५८३६ वाहनांची तपासणी करण्यात आली.

मुंबईत लोकसभा निवडणूकीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई झाली. सर्व ५ प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व १३ परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलीस ठाण्यामधून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक कामासह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी , संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखान्यांची तपासणी करण्यात आली. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, अमलीपदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू शोधण्यासाठी नाकाबंदीचे व शोधमोहिम राबवण्यात आली. फरार आणि वॊन्टेड व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वाॅरंट आणि स्थायी वाॅरंटची बजावणी, अवैध दारू, जुगार ई. अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त घालण्यात आली.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई

हेही वाचा : गेल्या ५० वर्षांत मुंबईकरांचा कौल एकाच पक्षाच्या बाजूने !

ऑलआउट मध्ये पुढील कारवाई करण्यात आली. मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. १७ अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक करण्यात आले. अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-या ४६ व्यक्तींवर अंमलीपदार्थ विरोधी कायद्या अन्वये अटकेची कारवाई करण्यात आली. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण ३१ जणांवर कारवाई करून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली. दारू विक्री /जुगार अशा अवैध धंद्यांवर १५ ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यात २५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. मुंबई शहराबाहेर हद्दपार केलेले, पंरतु मुंबई शहरात ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान विना परवाना प्रवेश केलेल्या एकुण ८२ तडीपार आरोपींवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाच्या कलम १२०,१२२ व १३५ अन्वये संशयितरित्या वावरणाऱ्या एकुण ८२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : मतपेढीसाठी भगवा नकोसा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप

मुंबई शहरात एकूण २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात अभिलेखावरील १०९५ आरोपी तपासण्यात आले . त्यामध्ये २१२ आरोपी मिळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १६०५ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात एकुण ५८३६ दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटारवाहन कायद्यान्वये १५५८ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम १८५ मो.वा.का. अन्वये एका मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करू देणाऱ्या ७३८ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली. धार्मिक व संवेदनशील अशा एकूण ५३९ तपासणी करण्यात आली.

Story img Loader